कामगारांनी चोरले तब्बल ४४० सिलिंग फॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:16 IST2021-09-16T04:16:05+5:302021-09-16T04:16:05+5:30
पुणे : इलेक्ट्रॉनिक दुकानात काम करणाऱ्या दोघा कामगारांनी तब्बल ४४० सिलिंग फॅन चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ...

कामगारांनी चोरले तब्बल ४४० सिलिंग फॅन
पुणे : इलेक्ट्रॉनिक दुकानात काम करणाऱ्या दोघा कामगारांनी तब्बल ४४० सिलिंग फॅन चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी अजित नहार (वय ५५, रा. कर्वेनगर) यांनी कोथरूड पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार दोघा कामगारांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथरूडमधील धनलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये नहार यांचे इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. त्यांच्या दुकानामध्ये फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२१ कालावधी दोघा कामगारांनी ११० बॉक्स मधून तब्बल ४४० सिलिंग फॅनची चोरी केली. दरम्यान, काही महिन्यानंतर नहार यांना विक्री आणि नफा यामध्ये फरक जाणवल्याने त्यांनी तपासणी केली असता, सिलिंगचे ११० बॉक्स मधून साडेचार लाखांचे फॅन चोरीला गेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी तपास करीत आहेत.
---