शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वॅक्स म्युझिअममध्ये कामगारांनी केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 02:17 IST

लोणावळा : आरोपींना राजस्थानातून अटक

लोणावळा : येथील सुनील वॅक्स म्युझिअममधील चोरीप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांपैकी दोन जणांनी वॅक्स म्युझिअमच्या कॉफी शॉपमध्ये पूर्वी काम केलेले असल्याने त्यांना या ठिकाणची माहिती होती.

म्युझिअमचे व्यवस्थापक अनिलकुमार तामराशन यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.मोतीराम छत्राराम ओटावत (वय २२), हरिराम मोतीराम चव्हाण (वय २०) व शंकर चौहान (वय २३, सर्व रा. दानवरली गाव, जिल्हा -पाली, राजस्थान) अशी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मार्च रोजी पहाटे तिन्ही आरोपींनी तोंडाला कपडा बांधत बंद दरवाजाच्या ग्रिलमधून आतमध्ये प्रवेश केला. कॅश काउंटरमधील दोन लाख रुपये रोख, दोन मॉनिटर व एक एलईडी टीव्ही चोरून थेट राजस्थानला पोबारा केला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवत त्यांना राजस्थान येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड करीत आहेत.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी जाळ्यातघटनेची माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व स्थानिक गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, वैभव सुरवसे, सामिल प्रकाश, राम जगताप यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवत राजस्थान गाठले. त्या ठिकाणी तीनही आरोपींना एक लाख ४२ हजार रुपयांची रोकड व एक मॉनिटर याच्यासह ताब्यात घेतले.

टॅग्स :Puneपुणेlonavalaलोणावळा