शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम साईटवर जात असताना मानेत काच घुसली; पुण्यात कामगाराचा दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 20:34 IST

विमाननगर येथील दुर्दैवी घटना; मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे गमावला जीव...

येरवडा - बांधकाम साइटवर काच घेऊन जात असताना झालेल्या अपघातात कामगाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. लोकेश शरद पाटे (वय 19, रा. न्यू मोदीखाना कॅम्प पुणे) याचा या अपघातात दुर्दैवाने मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. 

विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील एका खासगी बांधकाम साईडवर काचा बसवण्याचे काम सुरू होते. लोकेशसह इतर दोन कामगार काच घेऊन चालले होते. अचानक काचेला धक्का लागल्यामुळे काचेचा तुकडा लोकेश याच्या मानेत शिरला. उपचारासाठी एका टेम्पो मधून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून  नेमका अपघात कसा झाला, तसेच त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण? हे अधिक तपासातच स्पष्ट होईल. त्यानुसार कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिली.  लोकेश अत्यंत गरीब कुटुंबातील कष्टाळू युवक होता. त्याच्या पश्चात आई, वडील,बहीण असा परिवार आहे. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मागील काही दिवसांपासून तो मजुरीचे काम करत होता. त्याच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे कुटुंबातील मोठा आधार गेला आहे. मोदीखाना लष्कर परिसरातील सामाजिक उपक्रमात त्याचा सहभाग होता. त्याच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक व मित्र परिवार यांना मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :YerwadaयेरवडाAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस