मंचरमधील भूमिगत गटाराचे काम सुरू
By Admin | Updated: June 30, 2015 22:57 IST2015-06-30T22:57:25+5:302015-06-30T22:57:25+5:30
शहरातील शिवाजी चौकातील गटारांचे काम मार्गी लागले असून, भूमिगत गटारांचा फायदा व्यावसायिक, तसेच पादचाऱ्यांना होणार आहे.

मंचरमधील भूमिगत गटाराचे काम सुरू
मंचर : शहरातील शिवाजी चौकातील गटारांचे काम मार्गी लागले असून, भूमिगत गटारांचा फायदा व्यावसायिक, तसेच पादचाऱ्यांना होणार आहे. ३२ सिमेंट पाईपाचा वापर करून गटाराचे काम वेगाने सुरू आहे.
साळी हॉस्पिटल ते शिवाजी चौक या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण होऊन अतिक्रमणे काढण्यात आली होती. मात्र, गटाराचे काम मार्गी लागले नव्हते. रस्ता उंच झाला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्याशेजारील दुकानांत जाण्याचा धोका होता. त्यासाठी गटाराचे काम लवकर मार्गी लावण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. गटाराच्या कामासाठी आलेले सिमेंट पाईप अनेक दिवस रस्त्यालगत पडलेले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत होता. सोमवारी गटाराच्या कामाला सुरुवात झाली. जेसीबीच्या साहाय्याने खोदून त्यात सिमेंट पाईप टाकले जात आहेत. पहिल्या टप्प्यात ३२ पाईप जोडले जाणार आहेत. शिवाजी चौक ते मयूर हॉटेल असे एका बाजूचे काम होणार आहे. दुसरा टप्पा नंतर होणार आहे. गटाराचे काम करताना अनेक पाईपलाईन तुटत असून, त्याची दुरुस्ती लगेच केली जाते. शिवाजी चौकातील भूमीगत गटाराचे काम दोन दिवसात पूर्ण होण्याचे अपेक्षा आहे़ त्यामुळे वाहतूकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे़ लवकरच दुसऱ्या टप्याचे काम सुरू होईल़ (वार्ताहर)