शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
3
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
4
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
5
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
6
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
7
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
8
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
9
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
10
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
11
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
12
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
13
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
14
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
15
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
16
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
17
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
18
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
19
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
20
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव

लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर काम करा : राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 08:00 IST

लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सभा घेऊन भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन करुनही मनसेचा प्रभाव मतदारांवर पडल्याचे दिसले नाही...

ठळक मुद्देमतदार संघनिहाय चर्चा राज ठाकरे यांनी शाखाध्यक्ष व उपाध्यक्षांकडून जाणून घेतल्या पक्षवाढीसाठीच्या कल्पना  

पुणे : लोकसभा निवडणुकांमध्ये  ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाविरोधात रान उठवलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभेच्या तयारीसाठी पुण्यामध्ये कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. दोन दिवस पुण्यामधील अशोक नगरमध्ये नुकत्याच मतदार संघनिहाय घेतलेल्या बैठकांमध्ये शाखाध्यक्ष व उपाध्यक्षांकडून पक्षवाढीसाठीच्या कल्पना जाणून घेत संघटना मजबूत करण्यासाठी काय करता येईल या संदर्भात चर्चा केली. साहेबांनी आमचे म्हणणे  ‘शांततेत’ ऐकून घेतल्याचेही अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले. लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर काम करण्याच्या सूचनाही यावेळी ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केल्या. लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सभा घेऊन भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन करुनही मनसेचा प्रभाव मतदारांवर पडल्याचे दिसले नाही. आता विधानसभा निवडणुकांच्या तयारीला मनसेने सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शेवटच्या फळीतील कार्यकर्त्यांचे नमके काय म्हणणे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन दिवस पुण्यात ठाण मांडून बसलेल्या ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला पक्षाच्या मुख्य नेत्यांसह शहर पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक मतदार संघाला जवळपास दीड ते दोन तासाचा वेळ देण्यात आला होता. मतदार संघांमधील शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष 15-15 जणांच्या गटाने त्यांची भेट घेत होते. पक्षाचा गाभा कार्यकर्ता हाच असून त्याच्या पायावरच पक्ष उभा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय व्हावे, नागरिकांच्या पक्षाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घ्याव्यात, त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आवाज उठवावा अशा प्रकारच्या सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केल्या. यासोबतच पक्षांतर्गत नेमके काय सुरु आहे याचीही चाचपणी केली. पक्षाच्या अजेंड्यावर नेमके काय प्रश्न असावेत?, कार्यकर्त्यांना काम करताना नेमक्या काय अडचणी येतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीही त्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या. शाखाध्यक्षांनी ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, महिला सुरक्षा, विद्यार्थी करिअर मार्गदर्शन आदी छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून पक्षाला बळकटी मिळू शकेल अशाही कल्पना मांडल्या. शहरातील कोथरुड, शिवाजीनगर, पर्वती, कसबा, वडगाव शेरी, हडपसर मतदार संघांच्या पदाधिकारी आणि शहर पदाधिकाऱ्यांच्या वेगळ्या बैठका घेण्यात आल्या. ====विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या राज ठाकरे आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत आतापर्यंत तीन ते चार सविस्तर बैठका झाल्या आहेत. पक्षाचा अजेंडा आणि विधानसभेची रणनिती याविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले. मात्र, नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये विधानसभेसंदर्भात चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा