मळगंगादेवी कोविड सेंटरचे काम आदर्शवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:09 IST2021-06-04T04:09:47+5:302021-06-04T04:09:47+5:30
टाकळी हाजी : ज्ञानमंदिराबरोबरच आरोग्य मंदिरे उभी करणे ही काळाची गरज झाली आहे. टाकळी हाजी येथील श्री मळगंगादेवी ...

मळगंगादेवी कोविड सेंटरचे काम आदर्शवत
टाकळी हाजी : ज्ञानमंदिराबरोबरच आरोग्य मंदिरे उभी करणे ही काळाची गरज झाली आहे. टाकळी हाजी येथील श्री मळगंगादेवी कोविड सेंटरचे काम आदर्श असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले.
टाकळी हाजी येथील मळगंगा कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली. या वेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाबूराव वायकर, जिल्हा परिषद सदस्य सुनीता गावडे, शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, श्रीराम घुले, शिवाजी कांदळकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सोनभाऊ मुसळे, आरोग्यसेविका सुवर्णा थोपटे, कुंडलिक उचाळे, अशोक कानडे, चरपटनाथ भाकरे, शिवाजी घुले, बाबाजी गोरडे, भीमाजी साळवे, बबन भोरडे उपस्थित होते. दरम्यान, कोविड सेंटरमध्ये कीर्तन, मनोरंजनाचे कार्यक्रम यांसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, या सर्व उपक्रमांचे पानसरे यांनी कौतुक केले.
पोपटराव गावडे म्हणले की, कोविड सेंटरमध्ये स्वच्छतागृहाची आवश्यकता होती. त्यासाठी निधीची मागणी जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांच्याकडे केली असता त्यांनी तत्काळ १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करून काम पूर्ण केले.
०३ टाकळी हाजी
मळगंगा कोविड सेंटरच्या भेटीप्रसंगी बोलताना निर्मला पानसरे. व्यासपीठावर पोपटराव गावडे, सुनीता गावडे.