शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गीतेतील कर्मयोग जगणारा ‘योद्धा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 15:20 IST

एकदा शरद पवार यांनी विचारले की, अरविंद इनामदार असे का बोलतात़, तेव्हा मी त्यांना सांगितले होते की, जे पोलीस अधिकारी, कर्मचारी बोलू शकत नाही़ त्यांच्या मनातले इनामदार बोलतात़. ...........

ठळक मुद्देअरविंद इनामदार यांच्या जागविल्या आठवणी

पुणे : सज्जनांचे पाठीराखे, दुर्जनांचा कर्दनकाळ, पोलिसांसाठी झटणारे आणि त्यांच्यासाठी संघर्ष करत प्रसंगी आपल्या नोकरीचाही राजीनामा देणारे, आईनंतर गीताच आपले सर्वस्व, असे मानणारे साहित्य, अध्यात्मात रमणारे, गीतेतील कर्मयोग जगणारा योद्धा अशा शब्दांत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या आठवणी जागविल्या.अरविंद इनामदार यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले़. पुणे पोलीस, पोलीस संशोधन केंद्र, अरविंद इनामदार फाउंडेशन यांच्या वतीने मंगळवारी पोलीस संशोधन केंद्रात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते़. या वेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त डॉ़. के. व्यंकटेशम, सीआयडीचे प्रमुख आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, बिनतारी संदेश विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक रितेश कुमार, भय्यासाहेब इनामदार, जयंत इनामदार आणि अरविंद इनामदार फाउंडेशनचे विश्वस्त डॉ़ सागर देशपांडे उपस्थित होते़.यावेळी इनामदार यांचे मोठे बंधू भय्यासाहेब इनामदार यांचे मनोगत जयंत इनामदार यांनी वाचून दाखविले़. माजी पोलीस महासंचालक कृष्णन, अतुलचंद्र कुलकर्णी, डॉ़ सागर देशपांडे, मोहन यादव, संस्कृत तज्ञ डॉ़ श्रीकांत बहुलकर, हिम्मतराव देशभत्तार, राजेंद्र ढमाळ, रमेश पंढरपूर यांनी इनामदारांच्या आठवणी सांगितल्या़. सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सूत्रसंचालन केले़. ...........ते १० रुपये अजून जपून ठेवले...निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनेचे विद्याधर दडके यांनी सांगितले की, इनामदार यांना पैजा लावण्याची सवय होती़. पोलीस अधिकारी कमलाकर यांच्या मिशा पाहून त्यांनी ‘सांगते ऐका’च्या पाटलासारखा असल्याचे सांगितले़ तो अभिनेता कोण, यावर त्यांनी माझ्याशी पैज लावली़. पैज मी जिंकल्यावर त्यांनी मला १० रुपये दिले़. ते १० रुपये मी अजून जपून ठेवले आहेत़......स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा प्रॉब्लेमनिवृत्त पोलीस महासंचालक वसंतराव सराफ यांनी सांगितले की, मुंबई पोलीस आयुक्त असताना इनामदार अतिरिक्त पोलीस आयुक्त होते़. त्यांचा स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा प्रॉब्लेम होता़. एकदा मला गृह खात्यातून फोन आला़. तुम्ही अजून इनामदारांच्या बदलीची मागणी केली नाही़. .......जे आजवर जेथे होते, तेथील घटकप्रमुख काही महिन्यांत त्यांच्या बदलीची मागणी करीत असल्याचे मला सांगितले़. मी त्यांच्यातील चांगल्या गुणांना प्रोत्साहन दिले़.  त्यांचा स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा प्रॉब्लेम असल्याचे सांगून सराफ म्हणाले, एकदा शरद पवार यांनी विचारले की, अरविंद इनामदार असे का बोलतात़, तेव्हा मी त्यांना सांगितले होते की, जे पोलीस अधिकारी, कर्मचारी बोलू शकत नाही़ त्यांच्या मनातले इनामदार बोलतात़............महाराष्ट्रात पोलीस उपनिरीक्षकांच्या बढतीमध्ये खूप वर्षे जातात़ त्यावर त्यांनी मध्यम मार्ग काढून सहायक पोलीस निरीक्षक हे पद निर्माण केले़ एकदा त्यांनी आपल्याला तुमची बदली करणार, असे सांगितले़. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर बसून वाद घालून ही बदली रद्द करविली़. आपण प्रतिनियुक्तीसाठी अर्ज केला होता़; पण तो त्यांनी नाकारला़ तो का नाकारला, याचे कारण त्यांनी ३ वर्षांनी सांगताना ते म्हणाले, मला चांगले अधिकारी पाहिजेत म्हणून तुमचा अर्ज नाकारला़. ते आपल्या कनिष्ठ अधिकाºयांची संपूर्ण माहिती घेऊन नंतरच ते बोलत असत़- डॉ़. के़. व्यंकटेशम. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस