लिंगाळी ग्रामपंचायतीचे काम कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST2021-06-22T04:08:15+5:302021-06-22T04:08:15+5:30

लिंगाळी परिसरातील बालाजीनगर येथे अंतर्गत रस्ते तसेच बंदीस्त गटर अशा एकुण १४ लाख रूपयांच्या ...

The work of Lingali Gram Panchayat is commendable | लिंगाळी ग्रामपंचायतीचे काम कौतुकास्पद

लिंगाळी ग्रामपंचायतीचे काम कौतुकास्पद

लिंगाळी परिसरातील बालाजीनगर येथे अंतर्गत रस्ते तसेच बंदीस्त गटर अशा एकुण १४ लाख रूपयांच्या विकास कामाचा लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच सुनील जगदाळे, आबा वाघमारे, संगिता रणशृंगारे, सविता निमूणकर, संदीप येडे, संतोष गावडे, नितीन चितारे, जालिंदर जाधव, हरपाल अहलुवालीया, सुधाकर चितारे उपस्थित होते.

वीरधवल जगदाळे म्हणाले, जिल्हा परिषद सदस्य या नात्याने विकासासाठी काही निधी या पूर्वी दिला आहे. भविष्यात देखील दिला जाईल. लिंगाळी परिसरातील होणारी विकासकामे दर्जेदार होण्यासाठी विकासकामांवर ग्रामस्थांनी लक्ष ठेवून बांधकाम ठेकेदारांवर अंकुश ठेवल्यास विकासकामे निश्चितच टिकावू होतील. शासनाने विकासकामांसाठी निधी दिला, तरी या निधीचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी ग्रामपंचायत प्रशासन आणि नागरिकांनी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले. सरपंच सुनील जगदाळे यांनीही मनाेगत व्यक्त केले.

२१ दौंड लिंगाळी ग्रामपंचायत

बालाजीनगर ( ता. दौंड ) येथे रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी वीरधवल जगदाळे व इतर.

Web Title: The work of Lingali Gram Panchayat is commendable