शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पाच-सहावेळा मुदतवाढ मिळूनही कर्वेनगर उड्डाणपुलाचे काम अपूर्णच; वाहतुकीचा खोळंबा नित्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 12:33 IST

कर्वेनगरमधील चौकात संथगतीने सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. उड्डाणपुलाला सुरुवात होऊन तब्बल सहा वर्षे लोटली आहेत. त्यामुळे काम पूर्ण कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

ठळक मुद्देउड्डाणपुलाला सुरुवात होऊन लोटली तब्बल सहा वर्षे डिसेंबर २०१७ पहिल्या आठवड्यात हा पूल पूर्ण होईल : राजेश बराटे

कर्वेनगर : कर्वेनगरमधील चौकात संथगतीने सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. बांधकाम असेच संथ पद्धतीने चालू राहिल्यास पूर्ण कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

उड्डाणपुलाला सुरुवात होऊन तब्बल सहा वर्षे लोटली आहेत. आॅक्टोबर २०१५ पर्यंत त्याला मुदतवाढ करण्यात आली होती.  त्यावेळीही मुदतवाढ मिळूनही हे काम आता तरी पूर्ण होणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता.कर्वेनगर चौकात वारजे आणि डेक्कनकडून येणार्‍या रस्त्याबरोबर कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजकडून येणारा रस्ता व राजाराम पुलाकडून विकास मित्र मंडळ चौकात येणारा असे एकूण चार रस्ते एकत्रित येतात. परंतु, हे रस्ते ठराविक अंतर ठेऊन एकत्र येतात. त्यामुळे चौकात होणार्‍या वाहतूककोंडीमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेअतंर्गत हे काम हाती घेण्यात आले आहे.कर्वेनगर आणि वारजे अशा दोन टप्प्यात हे काम हाती घेण्यात आले होते. प्रथम भैरवनाथ मंदिर ते काकडे सिटी हा टप्पा असा ५०० मीटरचा टप्पा सुरू करण्यात आला. पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे अधिकारी सांगत आहेत, पण अशी किती वेळा अंतिम टप्प्याची वचने पालिका अधिकारी  देणार, असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष विनोद मोहिते यांनी विचारला.  कर्वेनगरचा पूल जेथे संपतो तेथेच पुढचे ८० मीटर अंतर सोडून सुमारे ७०० मीटर लांबीच्या या पुलाचे काम सुरू होणार असल्याचे नगरसेविका लक्ष्मी दुधाणे यांनी सांगितले. या दोन्ही पुलांचे काम एकाच वेळी सुरू करतील, असे नागरिकांना वाटत होते. परंतु, आंबेडकर चौकाच्या उजव्या बाजुला असलेल्या रस्त्या जवळील जागा ताब्यात घेण्यात आल्या नाहीत. विशेष भूसंपादन अधिकारी क्र.१६ यांची जागा ताब्यात घेण्याचा प्रक्रिया सुरू आहे. कर्वेनगरमधील पुलाचे काम संपत आले असून अजुनही जागा ताब्यात घेतल्या किंवा नाही, हे पालिका अधिकारी सांगत नाहीत. दोन्ही पुलांची लांबी १२०० मीटर असून त्यासाठी खर्च व दंडासह रक्कम कोणालाही सांगता आली नाही. 

 

कर्वेनगरमधील उड्डाणपुलाची वर्क आॅर्डर निघाल्यानंतर पाच महिन्यात काम सुरू झाले. मार्किंग फायनल नव्हते, तांत्रिक अडचणीमुळे दिवस वाया गेले. डिसेंबर २०१७ पहिल्या आठवड्यात हा पूल पूर्ण होईल. - राजेश बराटे, नगरसेवक 

टॅग्स :Puneपुणे