शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पुणे: शेतकरी व सर्वसामान्यांचे महसूल कार्यालयातील हेलपाटे वाचणार; फेरफार दुरुस्तीचे काम मिशन मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 17:41 IST

सर्वसामान्य नागरिकांचे महसूल कार्यालयातील हेलपाटे वाचणार आहेत...

पुणे : हस्तलिखित सातबारा व ऑनलाईन सातबारा यामध्ये जिल्ह्यात तब्बल 13 हजार 113 विसंगत सातबारे व विविध तक्रारी असलेले साडेचार हजार फेरफार दुरुस्त करण्यासाठी तातडीने सुनावणी घेण्याचे सांगण्यात आले आहे. येत्या मार्च अखेर पर्यंत हे काम मिशन मोडवर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी संबंधित सर्व यंत्रणेला दिले आहेत. यासाठी देशमुख स्वत: दररोज सायंकाळी सात वाजता ऑनलाईन बैठकीद्वारे प्रांताधिकारी, तहसीलदारापासून थेट सर्कल,  तलाठी यांचा आढावा घेणार आहेत. यामुळे जिल्हयातील हजारो शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे महसूल कार्यालयातील हेलपाटे वाचणार आहेत. 

राज्य शासनाच्या वतीने ऑनलाईन सातबारा ही मोहीम हाती घेऊन राज्यातील सर्व हस्तलिखित सातबारे ऑनलाईन केले. गेल्या अनेक वर्षापासून हे काम सुरू होते, सध्या शंभर टक्के सातबारे उतारे ऑनलाईन झाले असून, बहुतेक सर्व व्यवहारात ऑनलाईन सातबारा वापरला जात आहे. पुणे जिल्ह्यात तब्बल 14 लाख 98 हजार सातबारे ऑनलाईन करण्यात आले. हे हस्तलिखित सातबारे ऑनलाईन होताना अनेक चुका झाल्या आहेत. यात सातबा-यावरील क्षेत्र कमी जास्त होणे, सातबा-यावरील नावंच कमी होणे या सारख्या गंभीर चुकांन सोबत नावातील चुका असे अनेक प्रकार झाले आहेत.

या चुका लक्षात आल्यानंतर त्या तातडीन दुरुस्त करणे आवश्यक आहे. ही महसूल विभागाची जबाबदारी असताना सध्या सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांना वारंवार तलाठी, सर्कल, तहसीलदार कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात. तर अनेक वेळा सातबारा, फेरफार दुरूस्तीसाठी मोठे आर्थिक व्यवहार देखील होतात. यामुळेच डाॅ.राजेश देशमुख यांनी आता विसंगत सातबार व फेरफार दुरुस्तीसाठी खास मोहिम हाती घेतली आहे. 

यासाठी दररोज जिल्हाधिकारी स्वतःच सर्व प्रांतधिकारी,  तहसीलदार आणि सर्वाधिक प्रलंबित सातबारा व फेरफार दुरुस्ती असलेल्या तलाठी व सर्कल यांची ऑनलाईन आढावा बैठक घेणार आहे. प्रत्येक तालुक्याने दररोज किती फेरफार,  सातबारा दुरुस्त करायचे याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामुळे मार्च अखेर पर्यंत हे काम पूर्ण झाल्यास जिल्ह्यात हजारो सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय प्रलंबित विसंगत सातबारे व फेरफार दुरूस्ती तालुका     विसंगत सातबारे        फेरफार दुरुस्ती जुन्नर         154                      391वेल्हा           40                          48पुणे शहर       82                          8आंबेगाव         318                    235शिरूर             614                    295भोर                 623                    437पुरंदर              888                       342बारामती          835                        146मावळ             833                        457चिंचवड           803                           - इंदापूर            1075                        103दौंड                1019                         263मुळशी             1257                        284हवेली              3765                       1252---------------------------------------------

एकूण            13113                      4381प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करणे हेच उद्दिष्ट शासनाने ठरवून दिलेली लोकांची दैनंदिन कामे वेळेत पूर्ण करणे हेच चांगल्या प्रशासनाचे लक्षण असून, जिल्ह्यात तलाठी कार्यालयापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोकांना आपल्या कामासाठी हेलपाटे मारावे लागू नये हाच आपला प्रयत्न असतो. याचच एक भाग म्हणून आता जिल्ह्यात सर्व विसंगत सातबारा व तक्रारी असलेले फेरफार तातडीने दुरुस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. येत्या मार्च अखेर पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.- डाॅ.राजेश देशमुख,  जिल्हाधिकारी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड