‘टाइम बजेट’साठी फ्लोअरवर जाऊन काम
By Admin | Updated: April 2, 2016 03:24 IST2016-04-02T03:24:58+5:302016-04-02T03:24:58+5:30
दुसऱ्यांदा मिळालेली संधी व गेल्या वर्षीचे बजेट पूर्ण करताना आलेले अनुभव पाहता जिल्हा परिषद अध्यक्षांनी आपल्या कामाचे स्वरूप बदलले असून याचा प्रत्यय शुक्रवारी १ एप्रिल रोजी

‘टाइम बजेट’साठी फ्लोअरवर जाऊन काम
पुणे : दुसऱ्यांदा मिळालेली संधी व गेल्या वर्षीचे बजेट पूर्ण करताना आलेले अनुभव पाहता जिल्हा परिषद अध्यक्षांनी आपल्या कामाचे स्वरूप बदलले असून याचा प्रत्यय शुक्रवारी १ एप्रिल रोजी आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आला. त्यांनी आपल्या कक्षात बसण्याऐवजी सर्वच विभागांत जाऊन सभापतींच्या दालनात जाऊन ‘टाईम बजेटच्या कामाला सुरुवात केली.
यासंदर्भात कंद यांना विचारले असता आपण यापुढे त्या त्या विभागाच्या फ्लोअरवर जाऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या त्या विभागात जाऊन सभापती, अधिकारी यांच्या दालनात त्यांच्या खुर्चीत बसून आढावा घेतला. या वेळी त्यांच्यासमवेत माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे हेही होते.
सुरुवातीला समाजकल्याण विभागात जाऊन वाटप करण्यात येणाऱ्या पीठ गिरणींच्या नमुन्याची त्यांनी पाहणी केली. ते म्हणाले, ‘‘लाभार्थींना कोणतीही वस्तू देताना तिच्या दर्र्जात तडजोड सहन करणार नाही. त्यामुळे दाखवलेला नमुना व पुरवठा होणाऱ्या गिरणी त्याच दर्जाच्या आहेत का, हे पाहणे माझे काम आहे.’’
त्यानंतर समाजकल्याण, शिक्षण व बांधकाम विभागात जाऊन तेथील कामाचा आढावा घेतला.
बजेटच्या सभेतच ५० लाखांपुढील योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचा ठराव घेतला आहे. त्याचा खातेनिहाय आढावा घेण्यासाठी शनिवारी अधिकारी व पदाधिकाऱ्यांची तातडीची बैैठक घेण्यात येणार आहे. यात योजनांच्या अटी व शर्ती ठरवणे, प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता देण्याची कार्यवाही सुरू करण्याच्या अनुषंगाने निर्णय घेतले जाणार आहेत.
(प्रतिनिधी)
टंचाई कक्षाची परीक्षा
या भेटी दरम्यान अध्यक्ष यांनी पाणी पुरवठा विभागात जावून टंचाई कक्षाची परीक्षा घेतली. कक्षात जावून कोणाकडे काय काम आहे. त्याला त्या कामाची आजची स्थिती काय आहे? टँकर किती आहेत ? असे प्रश्न अधिकाऱ्यांना विचारले. कक्षाचे प्रमुख यावेळी उपस्थित नव्हते. पुढील काळात गांभीर्य लक्षात घेवून काम करा अशा सूचना दिल्या. लोकमतने यापूर्वी टंचाई कक्ष नावापुरता असे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर या कक्षात नियमीत आढावा सुरू झाला आहे.