अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून कार्य हीच ओळख फाउंडेशनचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST2021-06-16T04:13:48+5:302021-06-16T04:13:48+5:30
८ जुन २०१८ रोजी ‘कार्य हीच ओळख फाउंडेशन’ची स्थापना करून वृक्षारोपण,जलसंधारण, आरोग्य व रक्तदान शिबिर, किल्ले स्पर्धा, वाचनालय, ...

अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून कार्य हीच ओळख फाउंडेशनचा गौरव
८ जुन २०१८ रोजी ‘कार्य हीच ओळख फाउंडेशन’ची स्थापना करून वृक्षारोपण,जलसंधारण, आरोग्य व रक्तदान शिबिर, किल्ले स्पर्धा, वाचनालय, कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य हीच ओळख फाउंडेशनने दखलपात्र कार्य केले आहे. तसेच कोरोना महामारीच्या काळात अनेक गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, त्याचबरोबर समाजातील विविध घटकांना जीवनावश्यक साहित्य वाटप असे विविध उपक्रम आपली संस्था समर्थपणे राबवत आहे. तसेच वृक्षारोपण व त्यांचे संगोपण अशा उल्लेखनीय कार्याची मंगळवारी (दि. ८) आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. विजयकुमार काळे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समीर बनकर यांना सन्मानपत्र देण्यात आले. या वेळी रविकुमार काळे, सोनाली खाडे, गुनश्री रासकर, अक्षय धुमाळ, संदीप बनकर आदी उपस्थित होते.
————————————————
फोटो ओळी : डॉ. विजयकुमार काळे यांच्या हस्ते ‘कार्य हीच ओळख फाउंडेशन’ संस्थेला सन्मानपत्र देण्यात आले.
१४०६२०२१-बारामती-०४
————————————————