बारामती परिसरातील कामे खोळंबली

By Admin | Updated: November 18, 2016 05:55 IST2016-11-18T05:55:32+5:302016-11-18T05:55:32+5:30

तलाठी व ग्रामसेवकांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले असल्याने बारामती तालुक्याच्या विविध ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची

Work in Baramati area | बारामती परिसरातील कामे खोळंबली

बारामती परिसरातील कामे खोळंबली

मोरगाव : तलाठी व ग्रामसेवकांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले असल्याने बारामती तालुक्याच्या विविध ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची विविध कामे खोळंबली आहेत. विविध दाखले व ७/१२ उतारे मिळत नसल्याने ग्रामस्थ तर गावासाठी विकास निधी आणून कामे बंद असल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी त्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यातील १,१३० ग्रामसेवकांनी गुरुवार (दि. १७)पासून काम बंद आंदोलन विविध मागण्यांसाठी सुरू केले आहे. यामुळे मोरगाव, तरडोली, मुर्टी, पळशी, मासाळवाडी, लोणी भापकर, माळवाडी जोगवडी, सायंबाचीवाडी, आंबी येथील शेतकरी त्रस्त आहे.

Web Title: Work in Baramati area