दौंडला वाळूमाफियांचा हैदोस सुरूच

By Admin | Updated: January 20, 2015 23:33 IST2015-01-20T23:33:46+5:302015-01-20T23:33:46+5:30

तालुक्यात महसूल विभागाने वाळूमाफियांविरोधात गेल्या महिनाभरापासून कारवाईची धडक मोहीम राबवूनही तालुक्यात उपसा सुरूच आहे. ज्या-ज्या ठिकाणी कारवाई केली

Wonders of Walomafia Hondo | दौंडला वाळूमाफियांचा हैदोस सुरूच

दौंडला वाळूमाफियांचा हैदोस सुरूच

मनोहर बोडखे- दौेंड
तालुक्यात महसूल विभागाने वाळूमाफियांविरोधात गेल्या महिनाभरापासून कारवाईची धडक मोहीम राबवूनही तालुक्यात उपसा सुरूच आहे. ज्या-ज्या ठिकाणी कारवाई केली तेथून काही अंतरावर पुन्हा उपसा सुरू आहे. महसूल विभाग हतबल झाला असून, बेकायदेशीर वाळूउपसा करून शासनाची फसवणूक करणाऱ्याांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिली.
तालुक्यात मुळा-मुठा व भीमा नदीच्या पात्रात बेसुमार वाळूउपसा केला जात आहे. या वाळूमाफियांच्या दहशतीखाली नदीकाठचे रहिवासी वावरत आहेत. वाळूमाफियांवर ठोस अशी कारवाई होत नसल्याने वाळूमाफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बोटीच्या साह्याने, तसेच बिहारी पाडावाच्या साह्याने बेसुमार वाळूउपसा केला जात आहे.
बऱ्याचदा वन खात्याच्या जागेतून बेकायदेशीर वाळूउपसा केला जात असून, वन खाते आणि महसूल खाते वाळूचोरट्यांवर कारवाई करतात. मात्र, पुन्हा त्या ठिकाणी वाळूउपसा सुरू होतो. केवळ दंड आकारला जात असल्याने त्यांचे फावत आहे.

पत्रकाराला धमकी देणाऱ्यास अटक
देऊळगावराजे येथील पत्रकार अप्पासाहेब खेडेकर यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दत्तात्रय गिरमकर (रा. देऊळगावराजे, ता. दौंड) यांना अटक करण्यात आल्याची माहिती सहायक फौजदार दिनेश कुलकर्णी यांनी दिली. भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ वाळूमाफियांना मज्जाव करण्यासाठी लावण्यात आलेल्या खांबाचे चित्रीकरण खेडेकर गेले असता त्यांना जिवंत मारण्याची धमकी दत्तात्रय गिरमकर यांनी दिली. याचा दौंड तालुका श्रमिक पत्रकार संघटनेने निषेध केला असून, संबंधितांवर कडक कारवाई व्हावी म्हणून प्रांताधिकारी समीर शिंगटे, पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना निवेदन दिले आहे.

४बेकायदेशीर वाळूउपसा करून शासनाची फसवणूक करणाऱ्या वाळूमाफियांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिली. सध्याच्या परिस्थितीत वाळूमाफियांवर कारवाया करूनदेखील वाळूची चोरी केली जात आहे. ही गंभीर बाब आहे. त्यातच पत्रकारांना वाळूमाफिया धमकावत असेल, तर मात्र आता वाळूमाफियांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करून बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्यांना जरब बसविण्यात येणार असल्याचे शिंगटे म्हणाले.

आलेगावला
३ बोटी जाळल्या
देऊळगावराजे : आलेगाव (ता. दौंड) येथे वाळूउपसा करणाऱ्या ३ यांत्रिकी बोटी जिलेटिनच्या साह्याने जाळण्यात आल्या. तहसीलदार उत्तम दिघे, नायब तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांच्यासह महसूल खात्याचे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. आलेगाव परिसरात अनगर फाट्यानजीक बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाई करीत असताना काही वाळूमाफियांनी कारवाईत अडथळे आणल्याने काही वाळूमाफिया बोटी घेऊन फरार झाले.

अनेक प्रश्न भेडसावत असतानादेखील जिवावर उदार होऊन आम्ही वाळूमाफियांवर कारवाई करीत असतो. मार्च २०१४ ते आजपावेतो ४८ लाख ५१ हजार ४१० रुपयांचा दंड वसूल केलेला आहे.
- उत्तम दिघे , तहसीलदार

४मुळा-मुठा ते भीमा नदीचे अंतर मोठे असल्याने त्यातच महसूल खात्याची कर्मचारीसंख्या कमी असल्यामुळे एकाच वेळेला सर्वठिकाणी जाऊन कारवाई करता येत नाही.
४ज्या ठिकाणी कारवाई केली त्या ठिकाणचे वाळूमाफिया अन्य दुसऱ्या ठिकाणी जाऊन वाळूउपसा करीत असतात. त्यामुळे अपूर्ण कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे नेमकी कुठं कारवाई करावी, हाही प्रश्न आहे.

Web Title: Wonders of Walomafia Hondo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.