पुणे : पक्षितज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्याकडून पक्ष्यांच्या गमतीजमती ऐकणे ही मुलांसाठी आनंदाची पर्वणी ठरली. निमित्त होते भारती निवास सोसायटीच्या ३१ व्या वर्षाच्या प्रारंभी आयोजित केलेल्या किका कार्यक्रमाचे. किरण पुरंदरे हे ७० भारतीय पक्ष्यांचे आवाज काढू शकतात आणि त्यांच्याकडे त्यांच्या ५००० हून अधिक स्लाइड्स आहेत, असे संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी सुरुवातीलाच सांगितले. त्यामुळे उपस्थितांना त्यांच्या अभ्यासाची कल्पना आली. पुरंदरे म्हणाले, पुणे शहर आणि परिसरात सुमारे ३५० पक्षी दिसतात. महाराष्ट्रात ५६०, भारतात १३०० जातींचे तर जगात १०,००० जातींचे पक्षी दिसतात. काही पक्ष्यांना उडता येते तर काहींना येत नाही. पक्षी जेवढा आकाराने मोठा तेवढा तो जास्त जगतो. लहान पक्षी कमी जगतो. काकाकुवा ११० वर्षे, घुबड ६८, गिधाड ५२, मोर २० तर चिमणी ८ वर्षे जगते.'यलो फुटेड ग्रीन पिजन'हा महाराष्ट्राचा पक्षी असून तो अंजिरासारखी फळे खातो. ज्या पक्ष्याच्या पायाचे मधले बोट मोठे असते, तो जोरात पळू शकतो. सगळे पक्षी रोज अंघोळ करतात, असे पुरंदरे यांनी आवर्जून मुलांना सांगितले. पाऊस जवळ आला की पावश्या 'पेरते व्हा' असा संदेश देतो. गरुड विषारी साप मारून खातो आणि ते विष पचवूही शकतो. निशाचर पक्ष्यांचे डोळे मोठे असतात. अशा रंजक गोष्टी त्यांनी मुलांना सांगितल्या. त्यानंतर त्यांनी विविध पक्ष्यांचे आवाज काढले. त्यांची जुगलबंदीही ऐकवली. त्यात मुलांबरोबर मोठेही गुंगून गेले. प्रज्ञा गोवईकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. दाऊद सुतार यांनी पारदर्शिका दाखविल्या. माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले. या वेळी अनघा पुरंदरे उपस्थित होत्या.
पक्ष्यांच्या अद्भुत दुनियेची सफर; पुण्यातील भारती निवास सोसायटीचा वर्धापन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:07 IST
पक्षितज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्याकडून पक्ष्यांच्या गमतीजमती ऐकणे ही मुलांसाठी आनंदाची पर्वणी ठरली. निमित्त होते भारती निवास सोसायटीच्या ३१ व्या वर्षाच्या प्रारंभी आयोजित केलेल्या किका कार्यक्रमाचे.
पक्ष्यांच्या अद्भुत दुनियेची सफर; पुण्यातील भारती निवास सोसायटीचा वर्धापन दिन
ठळक मुद्देपुरंदरे काढू शकतात ७० भारतीय पक्ष्यांचे आवाज, त्यांच्याकडे आहेत ५०००हून अधिक स्लाइड्सकाकाकुवा ११० वर्षे, घुबड ६८, गिधाड ५२, मोर २० तर चिमणी जगते ८ वर्षे