शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
2
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
3
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं करण कळताच पती हादरला!
4
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
5
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
6
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
7
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
8
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
9
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
10
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
11
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
12
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
13
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
14
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
15
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
16
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
17
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
18
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
19
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
20
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

अहो आश्चर्यम् ! कोंबड्यांनी अंडी देणे केले बंद म्हणून थेट पोलिस स्टेशनच गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 19:02 IST

भेसळयुक्त खाद्य दिले म्हणून कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्याचा आरोप...

लोणी काळभोर : आपल्या कानावर सतत आश्चर्यकारक घटना येत असतात.पण चक्क कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्याने २७ जणांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची अजब घटना पुण्यात घडली आहे. या घटनेने सुरुवातीला पोलीस देखील चक्रावून गेले.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात  कंपनीने दिलेले भेसळयुक्त खाद्य कोंबड्यांना दिल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला असून त्यामुळे त्यांनी अंडी देण्याचे बंद केले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा सखोल तपास करून न्याय मिळवून द्यावा असा तक्रार अर्ज २७ जणांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिला आहे. 

 याप्रकरणी लक्ष्मण मुकुंद भोंडवे ( रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली ) यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्यांचेसमवेत या अर्जावर गिरीष दिगंबर चंद, अनिल जवळकर, गोरख विचारे, विनोद दत्तात्रय भोंडवे व धनंजय नारायण डांगे यांचेसह २७ स्वाक्षरी केली आहे. वरिल सर्वांनी ११ एप्रिल रोजी जाफा कॅमफिड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. ( प्लॉट नंबर ए - ११, एमआयडीसी, सुपा पारनेर ग्रोथ सेंटर, अहमदनगर ) या कंपनी कडून खाद्य घेतले होते. ते कोंबड्यांना दिले असता त्यांचे शरीरावर विपरीत परिणाम झाला. परिणामी त्यांनी अंडी देणे बंद केले आहे. यामुळे सर्वाचे मोठे नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात आलेनंतर याबाबत कंपनीस कळवले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून तक्रार अर्ज देण्यात आला आहे.  यासंदर्भात सविस्तर माहिती देताना लक्ष्मण भोंडवे म्हणाले की, अंडी देणाऱ्या कोंबड्यांना १०५ दिवसांनंतर सदर खाद्य दिले जाते. त्यानंतर २१ दिवसांनी कोंबड्या अंडी देण्यास सुरुवात करतात. यापूर्वी याच कंपनीचे खाद्य दिले होते. त्यावेळी कोंबड्या अंडी देत होत्या. परंतू ११ एप्रिल रोजी खरेदी केलेल्या कोंबड्यांना खाद्य दिल्यानंतर ३ दिवसांनी सुमारे १ लाखांपेक्षा जास्त कोंबड्यांनी अंडी देणे बंद केले आहे. इतर वेळी उन्हाळ्यात अंडी कमी दरात खपतात. परंतू, सध्या कोरोनाच्या महामारीमुळे होलसेल भावात ५ रूपये २० पैसे प्रतिअंड्याला भाव मिळत आहे. सद्य दराचा विचार केला तर आमचे जवळपास कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

हवेली तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय केला जातो. तालुक्यातील सर्व पोल्ट्रीचा विचार केला तर हा नुकसानीचा आकडा अब्जावधीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी याप्रकरणी तक्रार अर्ज घेण्यात आला आहे. कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या खाद्याचे नमुने तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. याचबरोबर नुकसान भरपाईसाठी कंपनी प्रशासनाशी बोलणार असून त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसbusinessव्यवसाय