शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

वारली कलेचे अद्भुत सौंदर्य कॅँटोन्मेंटच्या कमानीवर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 15:38 IST

खडकी कॅँटोन्मेंटच्या मुख्य कमानीवर चितारली जात असलेली वारली कला या ऐतिहासिक ठेव्याची साक्षीदार ठरणार आहे.

ठळक मुद्देआठ विद्यार्थी व शिक्षकाकडून साकार: जीवा सोम्या मशे यांना आदरांजली येत्या २५ मे रोजी खडकी कॅँटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कमानीवर साकारलेल्या वारली चित्रांचे अनावरण

श्रीकिशन काळे पुणे : वारली कला म्हणजे आदिवासी जीवनाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. या कलेतून त्यांचे जीवन सहजरित्या समोर येते. ही कला महाराष्ट्राचे भूषण आणि लोकसंस्कृती आहे. वारली कलेच्या सौंदर्याने नेहमीच लोकांना भुरळ घातली आहे. वारली कलेच्या अद्भुत आविष्काराला रसिकांचे उत्स्फूर्त व भरभरुन प्रेम मिळाले. अशी ही वारली कला...तिचा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहचावा आणि सामान्य नागरिकांपर्यंत या कलेचा प्रसार व्हावा,यासाठी खडकी कॅँटोन्मेंटच्या मुख्य कमानीवर वारली कला चितारली जात आहे. आठ विद्यार्थी व कला शिक्षक यांनी मिळून ही कला साकारत आहेत. ही वारली कला रस्त्यावरच्या मुसाफिरांना क्षणभर मोहिनी घालत त्यांचे लक्ष वेधून घेत आहे. जागतिक पातळीवर घेऊन जाणारे विख्यात चित्रकार जिव्या सोमा मशे यांचे नुकतेच निधन झाले. या कलेच्या माध्यमातून जिव्या सोमा मशे यांना एक प्रकारची आदरांजलीच वाहण्यात येत आहे. या कलेचा वारसा अहमदनगर येथील शिक्षक अरविंद कुडिया हे जपत आहेत. ते गेल्या बारा वर्षांपासून विद्यार्थ्यांना वारली कलेचे धडे देत आहेत. त्यांची ही कला पाहून खडकी कॅँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमोल जगताप यांनी खडकीच्या मुख्य कमानीवर ती साकारावी, अशी कल्पना मांडली. त्यामुळे कुडिया व त्यांचे आठ विद्यार्थी गेल्या आठ दिवसांपासून कमानीवर कला साकारत आहेत. यामध्ये दहावी आणि अकरावीचे विद्यार्थी आहेत. 

याबाबत कुडीया म्हणाले, वारली ही आपली संस्कृती आहे. ती लोप पावू नये आणि जपली जावी म्हणून मी प्रयत्न करत असतो. गेल्या बारा वर्षांपासून विद्यार्थ्यांना वारली कलेचे शिक्षण देत आहे. ही खूप सुंदर लोक कला आहे. महाराष्ट्राचे ते भूषण आहे. ही कला खडकीचे सीईओ अमोल जगताप यांनी पाहिली. त्यामुळे त्यांनी या कलेसाठी काही तरी केले पाहिजे असे सांगितले. त्यांनाच ही कल्पना सुचली की, कँटोन्मेंटच्या भिंतीवर वारली चित्रसौंदर्य साकारले जावे, त्यांनी मला बोलवले आणि आम्ही मग काम सुरू केले. नगरच्या कँटोन्मेंट शाळेतील आठ विद्यार्थी आम्ही निवडले आणि गेल्या आठ दिवसांपूर्वी काम सुरू झाले. मुलांमध्ये देखील खूप उत्साह आहे. त्यांना छान वाटत आहे. दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल. काडी किंवा तांदळाच्या पिठाऐवजी आम्ही अँक्रोलिक कलरने वारली चित्रे काढत आहोत. कारण भिंतीवर असल्याने ते लवकर खराब होऊ नये यासाठी कलरने काढत आहोत. पुढील पाच वर्षतरी याला काही होणार नाही.’’  मोकळा वेळ वारली कलेसाठी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांकडे मोकळा वेळ असतो. या वेळेचा सदुपयोग व्हावा, यासाठी अरविंद कुडिया हे दोन ते तीन तास विद्यार्थ्यांना वारली कलेचे धडे देतात. मुलांचा वेळ आणि ऊर्जा चांगल्या ठिकाणी लागावी. त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी ते विद्यार्थ्यांना वारली शिकवत आहेत.  जीवा सोम्या मसे यांच्याकडून प्रेरणा ‘‘काही वर्षांपूर्वी मी जीवा सोम्या मसे यांना थोडा वेळच भेटलो होतो. तेव्हा त्यांच्यातील ही कला, त्या कलेविषयीची आत्मियता पाहून मलाही ही कला जतन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांची ती भेट माझ्यासाठी खूप सकारात्मक होती. त्यांचे काम प्रचंड आहे. त्यांनी मोठ्या कष्टाने ही कला जोपासली. ही कला अत्यंत सोपी आणि सुंदर आहे. त्यातून खूप सुंदर भाव व्यक्त करता येतात. या कलेसाठी काही तरी करावे म्हणून मी विद्यार्थ्यांना शिकवतो,’’ अशा भावना अरविंद कुडिया यांनी व्यक्त केल्या.  शनिवारी अनावरण होणार येत्या २५ मे रोजी खडकी कॅँटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कमानीवर साकारलेल्या वारली चित्रांचे अनावरण करण्यात येणार आहे. ही वारलीचे चित्र २२ फूट उंच आणि ६५ फूट रूंद आहे. 

टॅग्स :Khadkiखडकीpune cantonment boardपुणे कॅन्टोन्मेंट बोर्डartकला