दारू धंद्याविरोधात महिलांचा एल्गार
By Admin | Updated: July 7, 2014 22:54 IST2014-07-07T22:54:35+5:302014-07-07T22:54:35+5:30
देऊनही हातभट्टी दारूचे धंदे बंद होत नसल्याने अखेर कासार आंबोली (तालुका मुळशी) येथील महिलांनी स्वत:च पुढाकार घेऊन हे धंदे बंद पाडले.

दारू धंद्याविरोधात महिलांचा एल्गार
पौड : वारंवार मागणी, निवेदने
देऊनही हातभट्टी दारूचे धंदे बंद होत नसल्याने अखेर कासार आंबोली (तालुका मुळशी) येथील महिलांनी स्वत:च पुढाकार घेऊन हे धंदे बंद पाडले.
पौड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कोंडे देशमुख यांना गावातील दारूधंदे बंद करण्याबाबतचे निवेदन भारतीय विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष राम गायकवाड, डॉ़ पद्माताई शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांनी दिले.
त्यानंतर गावातील दारूधंदे सुरू असलेल्या ठिकाणी मोर्चा काढून पोलिसांच्या सहकार्याने दारू जप्त करण्यात आली.
या आंदोलनात गावातील 115क् महिला उत्स्फूर्तपणो सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेच्या महिला प्रमुख छाया भिलारे व आशा लांडगे यांनी केले.
याप्रसंगी संतोष जाधव, गणोश भिलारे, राजू शिंदे, उमेश सुतार, संतोष शिंदे, बाळासाहेब गाभणो व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)