स्त्री शिक्षण गौरव दिनासाठी अंदाजपत्रकामध्ये तरतूद करणार
By Admin | Updated: January 2, 2016 08:36 IST2016-01-02T08:36:47+5:302016-01-02T08:36:47+5:30
महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी फातिमाबीबी शेख यांच्या साथीने भिडेवाड्यात १ जानेवारी १८८४ ला मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या दिवशी स्त्रीमुक्तीची पहाट

स्त्री शिक्षण गौरव दिनासाठी अंदाजपत्रकामध्ये तरतूद करणार
पुणे : महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी फातिमाबीबी शेख यांच्या साथीने भिडेवाड्यात १ जानेवारी १८८४ ला मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या दिवशी स्त्रीमुक्तीची पहाट झाली म्हणून हा दिवस स्त्री शिक्षण गौरव दिवस म्हणून साजरा करणे उचित आहे. त्याकरिता महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकामध्ये याकरिता तरतूद करणार असल्याची माहिती स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी दिली.
मुलींची १ ली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. या वेळी समितीचे निमंत्रक नितीन पवार, बांधकाम मजूर सभेचे प्रदेश अध्यक्ष मोहन वाडेकर, अंगवाडी पतसंस्थेच्या सुनंदा साळवे, नकुसाबाई लोखंडे, लक्ष्मण लोंढे, विजय जगताप, करीम सय्यद, शैलजा चौधरी, ज्योती गायकवाड, सुभाष रिठे उपस्थित होते.
भिडेवाड्याची दुरवस्था नितीन पवार यांनी अश्विनी कदम यांना दाखविली. एक स्त्री म्हणून पहिल्या शाळेची विदीर्ण अवस्था बघताना वेदना होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. नितीन पवार म्हणाले, ‘देशातील सामाजिक इतिहासाला स्त्री-पुरुष समतेचे वळण देणारी ही वास्तू विदारक अवस्थेमध्ये उभी आहे. स्मारक समितीने या वास्तूसाठी पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने १ कोटी ३० लाख रुपयांची रक्कम भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केली आहे, परंतु ताबाधारकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्याने गेली ५ वर्षे स्मारकाविषयी प्रगती झाली नाही.