गजबजलेल्या भागांत महिलांची कुचंबणा

By Admin | Updated: June 13, 2015 04:48 IST2015-06-13T04:48:54+5:302015-06-13T04:48:54+5:30

स्वच्छतागृहच नसणे, असली तरीपण ती बंद अवस्थेत किंवा त्यांना टाळे ठोकलेले. काहींची दुरवस्था झालेली तर दिशादर्शकच नसल्यामुळे या

Women's dilemma in the shambles | गजबजलेल्या भागांत महिलांची कुचंबणा

गजबजलेल्या भागांत महिलांची कुचंबणा

पुणे : स्वच्छतागृहच नसणे, असली तरीपण ती बंद अवस्थेत किंवा त्यांना टाळे ठोकलेले. काहींची दुरवस्था झालेली तर दिशादर्शकच नसल्यामुळे या भागात स्वच्छतागृह आहेत याची अनेकांना माहितीच नाही, हे चित्र आहे मध्यवस्तीतील अत्यंत वर्दळीच्या भागातील शहरांमधल्या महिला स्वच्छतागृहांचे! तुळशीबाग, रविवार पेठ, मंडई, फर्ग्युसन रस्ता या भागातील स्वच्छतागृहांच्या या अवस्थेमुळे महिलांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत, मात्र याची ना महापालिका प्रशासनाला जाण आहे ना लोकप्रतिनिधींना! महिलांच्या स्वच्छतागृहांबाबतच्या या गंभीर प्रश्नाकडे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षच केले जात आहे, नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत केसस्टडी म्हणून शहरात उभ्या करण्यात आलेल्या स्वच्छतागृह प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे, या स्वच्छतागृहांची स्थिती प्रत्यक्षात कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’च्या महिला प्रतिनिधींनी शहरातील गजबजलेल्या ठिकाणांची पाहणी केली असता हे धक्कादायक चित्र समोर आले.
साधारणपणे लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग किंवा फर्ग्युसन रस्ता हा परिसर खरेदीसाठी प्रसिद्ध असल्याने महिलांचा येथे मोठ्या प्रमाणावर वावर पाहायला मिळतो. हे प्रमाण पाहता या भागांमध्ये एक किमीच्या अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह किंवा सुलभ शौचालय असणे आवश्यक आहे, काही भागात ती आढळलीदेखील! मात्र दिशादर्शक नसल्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या महिलांनाच काय बहुतांश पुरुषवर्गालासुद्धा याची माहिती नसल्याचे दिसून आले. त्यामुळेच ‘काही कल्पना नाही’ अशीच उत्तरे पुरुषांकडून ऐकायला मिळाली. त्यामुळे ती शोधण्यासाठी काहीसे फिरण्याची वेळ आली. महिला विक्रेत्यांचीही स्वच्छतागृहांअभावी गैरसोय होत आहे काही स्वच्छतागृहे आतून चांगली आहेत, बाहेरून मात्र तिथे पोचता येत नाही.

Web Title: Women's dilemma in the shambles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.