अबलांच्या मदतीसाठी महिला बीट मार्शल
By Admin | Updated: July 1, 2015 03:46 IST2015-07-01T03:46:38+5:302015-07-01T03:46:38+5:30
महिला, मुली यांची टिंगल, त्यांच्यावर होणारे अत्याचार यांना परिणामकारक आळा घालण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील दोन सशस्त्र महिला कर्मचाऱ्यांची महिला बीट मार्शल

अबलांच्या मदतीसाठी महिला बीट मार्शल
पुणे : महिला, मुली यांची टिंगल, त्यांच्यावर होणारे अत्याचार यांना परिणामकारक आळा घालण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील दोन सशस्त्र महिला कर्मचाऱ्यांची महिला बीट मार्शल म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. एखाद्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचून महिलांना मदत करण्याचा प्रयत्न या महिला पोलीस करणार आहेत.
आज या महिला बीट मार्शलना १८ दुचाक्यांचे वाटप पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमासाठी सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुत्त्याल, सी. एच. वाकडे, मुख्यालयाचे उपायुक्त अरविंद चावरिया आदी उपस्थित होते.
मुख्यालयाचे उपायुक्त अरविंद चावरिया म्हणाले, ‘‘दोन दिवस या महिला बीट मार्शलना शस्त्रविषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
दोन दिवसांनी त्या प्रत्यक्ष गस्त
घालू लागतील. त्यांना रिव्हॉल्व्हरसारखे हाताळण्यास सोपे शस्त्र दिले जाईल. कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचण्याच्या दृष्टीने काय करता येईल, अशी कार्यपद्धती आखण्यात आली असून महिलांनी, मुलींनी शंभर नंबरवर संपर्क साधताच महिला बीट मार्शल त्या ठिकाणी रवाना होतील.
(प्रतिनिधी)