कर्तृत्ववान महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:13 IST2021-03-10T04:13:16+5:302021-03-10T04:13:16+5:30

जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला येथे,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर व शिवसेना महिला तालुका संघटिका स्वाती ढमाले,छाया ...

The women were felicitated with roses | कर्तृत्ववान महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार

कर्तृत्ववान महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला येथे,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर व शिवसेना महिला तालुका संघटिका स्वाती ढमाले,छाया जगताप शिवसेना पदाधिकारी व अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.यावेळी सर्व कर्तृत्ववान महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार,व हळदी- कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी दौंड पंचायत समितीच्या विद्यमान सभापती हेमलता फडके,माजी सभापती मीना धायगुडे,आशा शितोळे,डॉ.स्वाती लवंगारे,अंगणवाडी सेविका व मदतनिस संघटनेच्या तालुकाध्यक्ष रेखा शितोळे,किरण जांबले पडवी ग्राम पंचायत सदस्य शुभांगी चव्हाण, बोरीपार्धी ग्रामपंचायत सदस्य उषा सोडनवर यांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी कमल साळुंके, शालिनी मोरे, लक्ष्मी निंबाळकर, अर्चना चव्हाण, वैशाली नेवसे, मनिषा सरगर, वर्षा होळकर, छाया माने व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

चौफुला ता दौंड येथे जागतिक महिला दिनानिमित्त महेश पासलकर व महीला उपस्थित होत्या

Web Title: The women were felicitated with roses