शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज परिसरात घरफोड्या करणारी रेकॉर्डवरील महिला भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 15:30 IST

कात्रज परिसरात घरफोडी करणारी रेकॉर्डवरील महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली. तिच्याकडून एकूण ३ लाख ११ हजार ७००चा माल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देझडती घेतली असता मिळून आले १ नेकलेस, २ कानातील टॉप्सएकूण ३ लाख ११ हजार ७००चा माल जप्त

पुणे : कात्रज परिसरात घरफोडी करणारी रेकॉर्डवरील महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली. भारती विद्यापीठ परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी तिला अटक केले.घरफोड्यांना प्रतिबंध व्हावा, म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशावरून पोलीस उपनिरक्षक शिवदास गायकवाड पथकासह गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी सुमीत मोघे यांना मिळालेल्या माहितीनुसार, शहरात विविध ठिकाणी घरफोडी, चोरी करणारी महिला आरोपी लक्ष्मी अवघडे उर्फ लक्ष्मी विक्रम भिसे (वय ३०, रा. मु. पो. नाडे नवा रस्ता, ता. पाटण, जि. सातारा) हिने २ दिवसापूर्वी राजस सोसायटी भागातील एका बंगल्यात घरफोडी चोरी केली असून त्यातील काही सोने विकण्यासाठी त्रिमूर्ती चौक, आंबेगाव बुद्रुक येथे येणार असल्याचे समजले. तेव्हा सापळा रचून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले व पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार वाघचवरे यांनी तिला ताब्यात घेतले. महिला कर्मचार्‍यांच्या मदतीने झडती घेतली असता १ नेकलेस, २ कानातील टॉप्स मिळून आले. अधिक तपास केला असता तिच्याकडील एकूण १०२ ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ११ हजार ७००चा माल जप्त करण्यात आला. तिला अटक करुन न्यायालयात हजर केले असता तिची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपआयुक्त प्रवीण मुंढे, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, पोलीस कर्मचारी प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, गणेश सुतार, भिमराव पुरी, समीर बागसिराज, बाबा नरळे, योगेश सूळ, सुमीत मोघे, विक्रम खिलारे, अजित कोकरे, महिला कर्मचारी राणी शिंदे, सोनाली झगडे या पथकाने केली.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसCrimeगुन्हा