छेडछाड करणाऱ्यास महिलांनी दिला चोप

By Admin | Updated: May 4, 2017 16:19 IST2017-05-04T16:19:45+5:302017-05-04T16:19:45+5:30

रामटेकडी येथे अनेक दिवसांपासून महिलांना छेडणारा राकेश उर्फ फौजी डिंग्या याला महिलांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

Women strapped the person who did the tampering | छेडछाड करणाऱ्यास महिलांनी दिला चोप

छेडछाड करणाऱ्यास महिलांनी दिला चोप

ऑनलाइन लोकमत

हडपसर, दि. 04 - रामटेकडी येथे अनेक दिवसांपासून महिलांना छेडणारा राकेश उर्फ फौजी डिंग्या याला महिलांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. महिलांनी केलेल्या मारहाणीत डिंग्या जखमी झाला असून त्याच्याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामटेकडी येथील एका 55 वर्षीय महिलेने डिंग्याविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. त्या महिलेच्या सुनांसमोर लज्जास्पद कृत्य डिंग्या करत होता.त्याचप्रमाणे वस्तीतील इतर महिलांशीही त्याचे वर्तन असेच होते. दरम्यान, त्याने महिल्यांना शिव्या दिल्या, त्यावरुन सगळ्या महिलांनी एकत्र येवून त्याला लाकडाने चोपले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणाचा अधिक तपास वानवडी पोलिस स्टेशनचे पोलिस करीत आहेत.

Web Title: Women strapped the person who did the tampering