अपघातात महिला गंभीर जखमी

By Admin | Updated: November 18, 2016 06:02 IST2016-11-18T06:02:21+5:302016-11-18T06:02:21+5:30

येथील एसटी स्टँडजवळ जेजुरीकडून नीरेकडे जात असलेल्या टेम्पोच्या धडकेत वृद्ध महिला जखमी झाली. लक्ष्मीबाई पांडुरंग भुजबळ

Women seriously injured in the accident | अपघातात महिला गंभीर जखमी

अपघातात महिला गंभीर जखमी

वाल्हे : येथील एसटी स्टँडजवळ जेजुरीकडून नीरेकडे जात असलेल्या टेम्पोच्या धडकेत वृद्ध महिला जखमी झाली. लक्ष्मीबाई पांडुरंग भुजबळ असे या महिलेचे नाव असून, त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
गाडीमालक व ड्रायव्हर नीलेश मनोहर जोगदंड (वय २५, रा. बीड, देवबालगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे-पंढरपूर महामार्गावर वाल्हे परिसरात खूप खड्डे पडले आहेत. एसटी स्टँड, शाळा या ठिकाणी गतिरोधकांचा अभाव आहे. तसेच, येथील पोलीस चौकीत पोलिसांची संख्या कमी असल्याने वाहतुकीचे नियोजन योग्यरीत्या करता येत नाही. यामुळे वाल्हे पोलीस चौकीत कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Women seriously injured in the accident