तीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नवऱ्याला पाठीशी घालणाऱ्या पत्नीला सक्तमजुरीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 09:06 PM2019-01-31T21:06:06+5:302019-01-31T21:07:27+5:30

पोटच्या तीन मुलींवर नवरा बलात्कार करीत असल्याचे माहित असतानाही त्याला पाठीशी घालणाऱ्या पत्नीला ७ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. बलात्काराच्या घटनेत आईला शिक्षा झाल्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.

women send to jail for helping husband to rape her 3 daughters | तीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नवऱ्याला पाठीशी घालणाऱ्या पत्नीला सक्तमजुरीची शिक्षा

तीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नवऱ्याला पाठीशी घालणाऱ्या पत्नीला सक्तमजुरीची शिक्षा

Next

पुणे : पोटच्या तीन मुलींवर नवरा बलात्कार करीत असल्याचे माहित असतानाही त्याला पाठीशी घालणाऱ्या पत्नीला ७ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. बलात्काराच्या घटनेत आईला शिक्षा झाल्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.
 

नराधम बापाला न्यायालयाने जन्मठेप आणि १४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी हा निकाल दिला. दंड न भरल्यास बापाला १ वर्षे, तर आईला सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. शिक्षा झालेल बाप ४५, तर आई ४० वर्षाची आहे. हे कु टंूबिय कोंढवा भागात राहत असून, मूळचे उत्तरप्रदेशचे आहे. नराधमाने २२, १९ आणि १५ वर्षाच्या मुलींवर घरात कोणी नसल्याच्या फायदा घेत बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितले, तर बघून घेईन, अशी धमकी त्यांना दिली. मात्र, १५ वर्षीय मुलीने याबाबत ओळखीच्या महिलेला सांगितले. त्या महिलेच्या मुलाने घरात जावून आरोपीला याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने शिवीगाळ करून त्याला पाठवून दिले. घरातील गोष्टी बाहेर सांगितल्याचा रागातून त्याने १५ वर्षीय पीडितेला मारहाण केली होती. त्यावेळी ती मुलगी रागाने तिच्या मावशीच्या घरी गेली. आई तेथून तिला घेऊन आली. त्यानंतर तिच्यासह कोढवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार महिला पोलीस उपनिरीक्षक शितल सुतार यांनी याबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी पती आणि त्याला मदत केल्याप्रकरणात आईवर गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल केले. सुतार यांनीच या प्रकरणाचा तपास केला. त्यांना कोर्ट कॉन्स्टेबल अश्विनी पाटील यांनी मदत केली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे  अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी ११ साक्षीदार तपासले. त्यामध्ये १५ वर्षीय मुलीची आणि माहिती दिलेल्या शेजारच्या महिलेची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. 

मुलींचा आई-वडिलांवर सर्वाधिक विश्वास असतो. त्यांना शिक्षण देणे. देशाचे आदर्श नागरिक बनविणे, हे आई-वडिलांचे कर्तव्य आहे. मात्र, इथे आई-वडिलांनी मुलींसोबत गैरकृत्य केले आहे. त्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला आहे. पीडित १५ वर्षीय मुलीला तर घटनेपासून बाहेर सामजिक संस्थेत राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर समाजात चांगला संदेश जाण्यासाठी दोघांना अधिकाधिक शिक्षा देण्यात यावी, असा युक्तीवाद अ‍ॅड. पाठक यांनी केला. 

पाच वर्ष सुरू होता प्रकार 
नराधमाने तब्बल पाच वर्ष मुलींबर बलात्कार केला. २०१० ते २२ एप्रिल २०१५ या कालावधीत ही घटना घडली. पीडित तिन्ही मुलींनी याबाबत आईला सांगितले. त्यावेळी तुमच्या वडिलांवर कोणी तरी करणी केली आहे. त्यामुळे ते असे करतात. तुम्ही हा प्रकार कोणाला सांगू नका, असे म्हणत क्रर आईने नराधम वडिलाला पाठीशी घातले. 
 

Web Title: women send to jail for helping husband to rape her 3 daughters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.