महिलांनी सक्षम होणे गरजेचे
By Admin | Updated: March 24, 2017 03:46 IST2017-03-24T03:46:47+5:302017-03-24T03:46:47+5:30
महिलांचे हक्क व अधिकार मिळविण्यासाठी महिलांनी पुढे येणे गरजेचे असून, त्यासाठी महिलांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून सक्षम होणे गरजेचे

महिलांनी सक्षम होणे गरजेचे
शिक्रापूर : महिलांचे हक्क व अधिकार मिळविण्यासाठी महिलांनी पुढे येणे गरजेचे असून, त्यासाठी महिलांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून सक्षम होणे गरजेचे असल्याचे मत पुणे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी व्यक्त केले.
शिक्रापूर येथे माहेर संस्था आयोजित महिला मेळावा व उत्कृष्ट सामाजिक कामगिरीबद्दल बचत गटांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी मार्गदर्शन करताना मांढरे बोलत होत्या.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचविणार असल्याचेदेखील मांढरे यांनी सांगितले.
या वेळी शिरूर पंचायत समिती उपसभापती मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्या जयमाला जकाते, सरपंच अंजना भुजबळ, सारिका वाबळे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. तर, महिलांनी स्त्रीशक्तीचा आदर करणे गरजचे असल्याचे उपसभापती मोनिका हरगुडे यांनी सांगितले.
या वेळी पंचायत समिती उपसभापती मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्या जयमाला जकाते, सरपंच अंजना भुजबळ, ग्रामपंचायत सदस्या सुजाता खैरे, मीना सोंडे, जयश्री भुजबळ, सामाजिक कार्यकर्त्या मंगल सासवडे, वैशाली खेडकर, सारिका वाबळे, माहेर संस्थेचे आनंद सागर, अतुल शेळके, विक्रम भुजबळ, राजू साकोरे, विजय तवर, अनिता दुतोंडे, आम्रपाली अंकुशे, नंदिनी म्हस्के, योगेश भोर, राजा शेख, सणसवाडीचे माजी सरपंच मीना दरेकर यांच्यासह आदी मान्यवर तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रमेश दुतोंडे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप म्हेत्रे यांनी प्रास्ताविक केले. अतुल शेळके यांनी आभार मानले.(वार्ताहर)