महिला न्यायाधीशांना लाच प्रकरणात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:11 IST2021-04-02T04:11:30+5:302021-04-02T04:11:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : न्यायाधीशाला मॅनेज करून तुमची केस रद्द करायला लावते, असे सांगून ५० लाख रुपयांची लाच ...

Women judges arrested in bribery case | महिला न्यायाधीशांना लाच प्रकरणात अटक

महिला न्यायाधीशांना लाच प्रकरणात अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : न्यायाधीशाला मॅनेज करून तुमची केस रद्द करायला लावते, असे सांगून ५० लाख रुपयांची लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिला न्यायाधीशाला अटक केली.

अर्चना दीपक जतकर (रा. मावळ) असे अटक केलेल्या महिला न्यायाधीशाचे नाव आहे. न्यायालयाने जतकर यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

या प्रकरणात यापूर्वीच निलंबित पोलीस निरीक्षक अनिल ऊर्फ भानुदास जाधव याला अटक केली आहे़ तर, लाच घेताना जानेवारीमध्ये शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय २९) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजारांची लाच घेताना अटक केली होती. त्यानंतर या गुन्ह्यात महिला न्यायाधीशाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने अर्चना जतकर यांना अटक करण्यात आली.

अर्चना जतकर-शुभावरी गायकवाड यांच्यात तब्बल १४७ वेळा संपर्क करुन संभाषण केले आहे. गायकवाड यांनी फिर्यादी यांच्याविरुद्धच्या केसमध्ये त्यांच्या बाजूने काम करून देते असे म्हणाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचे सभाषण व्हाईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झालेले आहे. गायकवाड हिने फिर्यादीप्रमाणेच आणखी ७ ते ८ जणांना जागेच्या वादासंदर्भात कोर्टातून निकाल लावून देण्यासाठी संपर्क केल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व जमिनीच्या संदर्भातील वाद जतकर यांच्या कोर्टामध्येच सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.

न्यायाधीश जतकर यांनी आरोपीसोबत संपर्क साधण्यासाठी वापरलेले सीमकार्ड हे मुंबईतील समता कुबडे यांच्या नावावर आहे. त्यांनी जतकर यांना दोन सीमकार्ड दिले आहेत. दुसरे सीमकार्ड जतकर यांनी कोणाला दिले याचा तपास करायचा आहे.

जतकर यांनी गुन्ह्यातील इतर आरोपी भानुदास जाधव याला एकूण १८ कॉल केले असून सुशांत केंजळे याला ४ कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे. जतकर व इतर आरोपी यांनी यापूर्वी कट रचून आणखी काही गुन्हे केले आहेत काय याचा तपास करायचे असल्याचे सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी ६ दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. सहायक पोलीस आयुक्त सिमा मेहेंदळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Women judges arrested in bribery case