शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेच्या घरात चाेरी करणाऱ्या महिलेला बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 15:09 IST

सिंहगड रोड परिसरातील नगरसेविका ज्योती किशोर गोसावी यांच्या घरात चाेरी करणाऱ्या महिलेला सीसीटिव्हीच्या माध्यमातून शाेध घेत पाेलिसांनी अटक केली अाहे.

पुणे : सिंहगड रोड परिसरातील नगरसेविका ज्योती किशोर गोसावी यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करुन ९ तोळे सोन्याचे दागने लंपास करणारी महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तिच्यासह चोरीचे दागिने घेणाऱ्या सराफाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे़ हर्षा सुरेश शितोळे (वय ५३, रा़ पर्वती निवास, हिंगणे खुर्द) आणि सराफ कामाक्षी जेम्स अँड ज्वेलर्सचे मालक देवराय गणपती रेवणकर (वय ६५, रा़ शनिवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़     याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती गोसावी (रा़ पार्थ बंगला, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करीत असताना एक संशयित महिला तोंडाला रुमाल बांधून फिरत असल्याचे निदर्शनास आले. तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने तिचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या़ तरीही सर्व शक्यता गृहीत धरुन आजूबाजूच्या सुमारे २ किमी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करीत असताना पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे, राहुल शेडगे यांना मिळालेल्या माहितीवरुन हर्षा शितोळे हिनेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तिला अटक केल्यावर तिने गुन्ह्याची कबुली दिली़.     हर्षा शितोळे हिचेवर पूर्वी पुणे शहरात विविध पोलीस ठाण्यात सुमारे १५ गुन्हे दाखल असून ती चोरीच्या गुन्ह्यात २ वर्षे शिक्षा भोगून आलेली आहे. तिच्याकडून चोरीचे सोने विकत घेणारे कामाक्षी जेम्स अँड ज्वेलर्स या दुकानाचे मालक देवराय गणपती रेवणकर यांनाही अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ़ प्रवीण मुंडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीश सोनवणे तसेच कर्मचारी यशवंत ओंबासे, संतोष सावंत, सुनिल पवार, दत्ता सोनवणे, राहुल शेडगे, श्रीकांत दगडे, दयानंद तेलंगे पाटील, मयुर शिंदे, सचिन माळवे, निलेश कुलथे, वामन जाधव यांनी केली़.

 

 

टॅग्स :PuneपुणेtheftचोरीThiefचोरSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीस