पोलिसांपेक्षा माणुसकीमुळेच महिला सुरक्षित

By Admin | Updated: December 13, 2014 00:44 IST2014-12-13T00:44:26+5:302014-12-13T00:44:26+5:30

रात्री बारा ते अडीचची वेळ. निजर्न ठिकाणी वाहनांना लिफ्ट मागण्यासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन तरुणी. त्यांना मोटारचालक लिफ्ट देतात,

Women are safe because of humanity | पोलिसांपेक्षा माणुसकीमुळेच महिला सुरक्षित

पोलिसांपेक्षा माणुसकीमुळेच महिला सुरक्षित

प्रवास निर्धोक प.. : हिंजवडी, सांगवी, औंध, कात्रज भागातील रस्त्यांवर रात्रीची गस्तच नाही
पुणो : रात्री बारा ते अडीचची वेळ. निजर्न ठिकाणी वाहनांना लिफ्ट मागण्यासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन तरुणी. त्यांना मोटारचालक लिफ्ट देतात, आस्थेवाईकपणो चौकशी करून त्यांना इच्छित स्थळी सोडतात, केवळ माणुसकी म्हणून. सुजाण आणि संवेदनशील नागरिकांमुळे पुण्यातल्या रस्त्यांवर महिला सुरक्षित आहेत. मात्र, आयटी सिटी म्हणून ओळखल्या जाणा:या पुण्यातील आयटी कंपन्यांच्या परिसरात मात्र गस्त किंवा नाकेबंदी करणारे पोलीस शोधूनही सापडत नाहीत. एखादी वाईट घटना घडल्यावरच तेवढय़ापुरत्या उपाययोजना करण्याची पोलिसांची बेपर्वाई ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत गुरुवारी रात्री उघडकीस आली. 
पुण्यातील आयटी कंपन्या असलेल्या हिंजवडी ते पुणो विद्यापीठ, पुणो विद्यापीठ ते सांगवी, हिंजवडी ते कात्रज आणि बंडगार्डन ते कल्याणीनगर या परिसरात ही लोकमत प्रतिनिधींनी ही पाहणी केली. 
संगणक अभियंता नयना पुजारी, ज्योती कुमारी अशा एक ना अनेक तरुणींच्या खून प्रकरणाच्या घटनांनी पुण्यातील नोकरी करणा:या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच ऐरणीवर राहिला आहे. या घटनांनी आयटीमध्ये तसेच रात्री उशिरार्पयत विविध कार्यालयांमध्ये काम करणा:या महिलांना हादरवून सोडले होते. पुणो महिलांसाठी असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण झाले होते. 
पोलिसांनी कॅबचालक आणि मालकांच्या त्या वेळी बैठका घेऊन प्रबोधनही केले. गेल्या चार वर्षात अशी घटना घडलेली नसली, तरीदेखील सुरक्षिततेचा मुद्दा कायमच चर्चेत असतो. नुकत्याच दिल्ली येथे तरुणीवर कॅबचालकाने बलात्कार केल्याच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर पुण्यातील रस्त्यांवर रात्री उशिरा तरुणी आणि महिला निर्धोकपणो फिरू शकतात का, याची पाहणी ‘लोकमत’ने केले.
 
पोलिसांची ना गस्त, ना दर्शन
शुक्रवारी रात्री साधारणपणो बारा ते पहाटे अडीचर्पयत केलेल्या या पाहणीमध्ये ऑपरेशनदरम्यान हिंजवडी, पुणो विद्यापीठ, औंध, मुंबई बेंगलोर महामार्गावर कुठेही पोलिसांची गस्त आढळली नाही. रात्र गस्तीची डय़ुटी लावलेले अधिकारी आणि पोलीस कर्मचारी कुठेही दिसले नाहीत. गस्तीवरील वाहने तर दूरच, परंतु एखादा पोलीस कर्मचारीही चतु:श्रृंगी पोलीस ठाणो, विद्यापीठ चौकी, हिंजवडी चौकातील वाहतूक चौकीच्या बाहेर दिसला नाही. त्यामुळे एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती उद्भवलीच, तर पोलिसांचा वावर जाणवण्याइतपतही पोलिसांची सतर्कता आढळून आली नाही.  पोलिसांनी या कुठल्याही रस्त्यांवर नाकाबंदी, चेकिंग पॉइंट्स किंवा बॅरीगेटिंग केलेले नव्हते. दिल्लीमधील बलात्काराच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व कॅबचालकांची बैठक घेतली होती. त्याचाही विसर या भागातील पोलिसांना पडल्याचे एकंदरीत चित्र दिसत होते. 
 
सुजाण तरुणाई
पुण्याची सुरक्षितता तरुणाईच्या सुजाणतेमुळे आहे, असे या पाहणीत स्पष्ट झाले. दिवसा गर्दीच्या ठिकाणीही छेडछाडीचे प्रकार होतात. परंतु, सामसूम असणा:या चौकांत, रस्त्यांवर एकटय़ा- दुकटय़ा तरुणींना पाहून अशिष्ट वर्तन होत नाही. याउलट पाहणा:यांच्या नजरेत काळजीच असते, असा अनुभव आला.
 
पोलिसांकडून हलगर्जी
4हिंजवडी चौकात प्रवास करणा:या कॅब्सची तपासणी नाही. 
4बाणोर, पाषाण, विद्यापीठ, औंध, हिंजवडी या प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदीचा अभाव. 
4कॅबचालकाच्या ओळखपत्रंची तपासणी होत नसल्याचे चित्र.
4गस्ती पथक अकार्यक्षम.
4रात्रपाळीला काम करणा:या महिलांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणाचेच दर्शन.
 
आपणही घ्या ही काळजी..
माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी सोबत चाकू, मिरची पूड अशी साधने ठेवावी, असे सांगितले होते. मात्र याकडे चेष्टेने पाहिले गेले. ‘लोकमत’ ने केलेल्या या पाहणीसाठी गेलेल्या महिला प्रतिनिधींनी पर्समध्ये मिरची पूड, सुरक्षेची साधने व छोटा चाकू ठेवला होता. तसेच एका प्रतिनिधीच्या मोबाईलवर फोन करून कॉल सुरू ठेवण्यात आल्याने मनोधैर्य वाढल्याचा अनुभव होता. 
 
4हिंजवडीतील एका हॉटेलबाहेर अनेक तरुण दुचाकींवर आणि कट्टय़ावर बसलेले होते. कुणाच्या हातात सिगारेटी होत्या, तर कुणी चहा पित होते. कॅबची वाट पाहत बसलेले होते. या तरुणांच्या गर्दीमध्ये दोन तरुणी रात्री पाऊणच्या सुमारास कॅबला हात करत असल्याचे पाहून या हॉटेलमधील एक कर्मचारी बाहेर आला.  
4कुठे जायचे आहे, अशी विचारणा करीत त्याने अजून शिफ्ट सुटलेल्या नसल्यामुळे लगेचच कॅब मिळणो अवघड असल्याचे सांगितले. 
4एक वाजल्यानंतर कॅब मिळेल, असे सांगत त्याने स्वत: पुढे होऊन दोन- तीन कॅबचालकांना थांबवून लिफ्ट देण्यासंदर्भात विचारले. एका मोटारचालकालाही त्याने विचारले; 
परंतु त्याने सांगितलेली रक्कम ऐकून त्यानेच तरुणींना जाऊ नका, असा सल्लाही दिला.
 
प्रसंग एक..
रात्री साडेबाराची वेळ ..‘लोकमत’च्या दोन महिला प्रतिनिधी हिंजवडी येथील विप्रो कंपनीसमोर जाऊन उभ्या राहिल्या. आयटी कंपनीतील अभियंता असल्याचे भासवत यातील दोघी जणींनी खासगी कॅबकडे लिफ्ट मागण्यास सुरुवात केली. बराच वेळ लिफ्ट मागूनही कोणीच कॅबचालक थांबत नव्हता. ब:याच वेळाने रात्री एक वाजण्याच्या सुमारास  एक मोटार थांबली. पुणो विद्यापीठ चौकामध्ये जायचे आहे, असे त्यांना सांगितल्यावर मोटारीतील दोघांनी या तरुणींना मोटारीत बसवून घेतले. काही अंतरावर गेल्यावर मोटार थांबवली. चालकाने सीट बदलली आणि त्याचा मित्र मोटार चालवायला बसला. काही वेळातच ही मोटार सुसाट वेगाने पुणो विद्यापीठाच्या दिशेने धावू लागली. हिंजवडी, सांगवी, औंध अशा रस्त्याने आलेल्या या चालकाने तरुणींना सुरक्षितपणो विद्यापीठ चौकामध्ये सोडले.  ‘तुम्ही दोघी रात्री उशिरा थांबल्याचे दिसलात म्हणून सोडायला आलो. वास्तविक आम्हाला या रस्त्याला यायचे नव्हते. केवळ माणुसकी म्हणून तुमच्यासाठी आलो,’ असे सांगून कॅबचालकाने माणुसकीचा अनुभव दिला. 
 
प्रसंग दोन..
विद्यापीठ चौकातील सांगवीकडे जाणारा रस्त्यावरील बसथांबा. वेळ रात्री सव्वाची. दोन तरुणी थांबलेल्या. बराच वेळ थांबूनही लिफ्ट मिळत नव्हती. या तरुणींना पाहून पुढे गेलेली चंदीगढ पासिंग असलेली एक खासगी मोटार पुन्हा परत फिरून आली. सव्वाएकच्या सुमारास या तरुणींना लिफ्ट मिळाली. सांगवीला जायचे असल्याचे सांगून या प्रतिनिधी मोटारीत बसल्या. मर्यादित गतीने निघालेल्या या मोटारीमध्ये चालकासह तिघे जण बसलेलेले होते. या तरुणींकडे काय करता, कोठे नोकरी करता? असे प्रश्न केवळ उत्सुकतेने विचारले. औंध चौकातून ‘एकटय़ा जाल का?’ विचारून काळजीही दाखविली. 
 
प्रसंग तीन..
रात्री दोन वाजण्याच्या सुमारास देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्गावर हिंजवडी चौकात दोन तरुणी थांबलेल्या. कोणताही कॅबचालक थांबायला तयार नव्हता. मध्येच दोन- तीन लक्झरी बस येऊन थांबून गेल्या. दरम्यानच्या काळात दुचाकीवरून अनेक तरुण जात होते. परंतु, कोणीही अशिष्ट वर्तनाचा प्रयत्नही केला नाही. काही वेळाने एक मोटार येऊन बसथांब्यावर थांबली. तरुणींनी त्यांच्याकडे कात्रजर्पयतची लिफ्ट मागितली. कात्रजला सोडण्याची तयार दर्शविल्यावर दोघीही मोटारीत बसल्या. मोटारीमध्ये चालक आणि आणखी एक असे दोघे जण पुढे बसलेले होते. त्यांनीही काय करता? असे विचारल्यावर तरुणींनी आयटीमध्ये नोकरी करतो, असे सांगितले. शिक्षण, आयटीसाठीची शैक्षणिक पात्रता आदी विषयांवर गप्पा मारता मारता ही मोटार दोन वाजून पंचवीस मिनिटांनी कात्रजला पोचली. 
 
 

 

Web Title: Women are safe because of humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.