शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात महिला असुरक्षित! भररस्त्यात अल्पवयीन मुलींची छेड, विरोध करताच मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 13:20 IST

मुलींनी विरोध केला असता त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना

पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : पुण्यात महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सातत्याने महिलांची महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेड काढणारे प्रकार घडत असतात. पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून असाच प्रकार उघडकीस आला आहे. किराणा दुकानात सामान आणण्यासाठी निघालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा भर रस्त्यात विनयभंग करण्यात आला. या मुलींनी विरोध केला असता त्यांना मारहाण करण्यात आली. 

याप्रकरणी आदित्य शिंदे उर्फ गोऱ्या याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलींच्या आईने या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रामटेकडी परिसरातील नुरुल अंजुमन मस्जिदसमोर शनिवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी भादवी 354, 354 अ, 354 ब, 323 पोक्सो 8, 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या 16 आणि 13 वर्षे वयाच्या मुली सामान घेण्यासाठी किराणा दुकानात चालल्या होत्या. यावेळी नुरुल अंजुमन मस्जिदसमोर राहणारा आरोपी आदित्य शिंदे यांनी या मुलींचा रस्ता अडवत त्यांच्याकडे मोबाईल क्रमांक मागितला. मुलींनी मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्याने आरोपीने यातील एका मुलीला ओढणीद्वारे जवळ ओढले. त्या मुलीने त्याला विरोध केला असता तिच्या कानाखाली चापट मारली. दुसऱ्या मुलीसोबतही त्याने अश्लील चाळे केले आणि तिच्या देखील कानाखाली मारली. 

या सर्व प्रकाराने घाबरलेल्या मुलींनी घरी गेल्यानंतर आईला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी