महिला आनंदी व निरोगी, तर कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले : डॉ.राजेंद्र डिंबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:21 IST2021-02-21T04:21:00+5:302021-02-21T04:21:00+5:30
भोर तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे येथील सिध्दिविनायक या रुग्णालयात महिलांसाठी 'वाण आरोग्याचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ...

महिला आनंदी व निरोगी, तर कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले : डॉ.राजेंद्र डिंबळे
भोर तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे येथील सिध्दिविनायक या रुग्णालयात महिलांसाठी 'वाण आरोग्याचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉक्टर सेलच्या वतीने डॉ. राजेंद्र डिंबळे, डॉ. सविता डिंबळे व डॉ. शिवाजी चव्हाण यांनी महिलांचे आजार व आरोग्यविषयक जागृती माहिती दिली. उपस्थित महिलांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी तसेच बीपी शुगर तपासणी करण्यात आली. महिलांना आरोग्य व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भोर तालुका अध्यक्षा विद्या यादव, भोर शहराध्यक्षा हसीना शेख, भोर पंचायत समितीच्या सभापती दमयंती जाधव, ओबीसी सेलच्या अध्यक्षा शुभांगी वायदंडे, गणेश यादव, प्रशांत यादव व इतर महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
--
फोटो क्रमांक : २० नसरापूर आनंदी आरोग्य
सोबत फोटो व ओळ : नसरापूर (ता. भोर)येथे 'आरोग्याचे वाण' कार्यक्रमात महिलांना स्त्रीच्या आरोग्या संदर्भात मुक्त संवाद साधून आरोग्याचे अनोखे वाण देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.