शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेल टाकून पतीला पेटविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 20:18 IST

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होते होते. त्यामुळे पती सखाराम यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पत्नी मंगल यांचा त्याला विरोध होता.

ठळक मुद्देसखाराम यांच्या हाता- पायावर वार करून केल्याने गंभीर जखमी

पुणे : घटस्फोटाचा खटला मागे घे, अशी धमकी देत वार करत रॉकेल ओतून पतीला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीसह तिघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. टेकाळे यांनी तिघांना ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.    शुक्रवारी (२७ जुलै) रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास डीपी रोडवर ही घटना घडली. पत्नी मंगल सखाराम गायकवाड (वय ३३, रा. जनता वसाहत), मेहुणा दादासाहेब रघुनाथ खडागळे (वय २३, रा. पर्वती) आणि सखाराम खंडू भदिर्गे (वय ५३, रा. जनता वसाहत) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पती सखाराम शिवाजी गायकवाड (वय ५३, रा. जनता वसाहत, पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे. सखाराम आणि मंगल हे पती-पत्नी आहेत. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये सतत वाद होते होते. त्यामुळे सखाराम यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यास मंगल यांचा विरोध होता. त्याच रागातून सखाराम हे डीपी रस्त्यावर टेम्पो घेवून थांबले असता खडागळे, भदिर्गे यांनी त्यांना शिवीगाळ करत घटस्फोटाची केस मागे घेण्यासाठी धमकी दिली. त्यावेळी सखाराम यांच्या हातावर, पायावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांनी सखाराम यांच्या अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तिघांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील हत्यार जप्त करण्यासाठी त्यांचा इतर कोणी साथीदार आहे का? याचा शोध घेण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील बी. आर. पाटील यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने तिघांना कोठडी सुनावली. 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणेPoliceपोलिस