महिलेचा सव्वा लाखाचा ऐवज लंपास
By Admin | Updated: January 23, 2017 03:21 IST2017-01-23T03:21:33+5:302017-01-23T03:21:33+5:30
हळदी-कुंकवाचा कार्यक्रम संपवून घरी येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेचे १ लाख २५ हजार रुपयांचे दोन मंगळसूत्र

महिलेचा सव्वा लाखाचा ऐवज लंपास
पुणे : हळदी-कुंकवाचा कार्यक्रम संपवून घरी येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेचे १ लाख २५ हजार रुपयांचे दोन मंगळसूत्र हिसकावले. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावर आकाशवाणीजवळ घडली. हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हडपसरमध्ये राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम संपवून घरी जात होती. आकाशवाणीजवळून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना हेरले. त्यांचे दोन मंगळसूत्रे हिसकावत चोरट्यांनी पळ काढला. सहायक निरीक्षक एस. एन. देशमाने तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)