चोरी करताना महिलेला पकडले

By Admin | Updated: March 24, 2017 04:23 IST2017-03-24T04:23:18+5:302017-03-24T04:23:18+5:30

खरेदीच्या बहाण्याने आलेल्या महिलेने सराफी दुकानातील मंगळसूत्रामधील सोन्याच्या वाट्या लंपास करण्याचा प्रयत्न केला.

The woman was caught stolen | चोरी करताना महिलेला पकडले

चोरी करताना महिलेला पकडले

पुणे : खरेदीच्या बहाण्याने आलेल्या महिलेने सराफी दुकानातील मंगळसूत्रामधील सोन्याच्या वाट्या लंपास करण्याचा प्रयत्न केला. या महिलेला दुकानदाराने जागेवरच पकडून सिंहगड रस्ता पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सिंहगड रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौकात घडली.
सराफ परमेश्वर बेरागी यांचे उंबऱ्या गणपती चौकात श्री धनलक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आरोपी महिला दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यांच्या दुकानात आली. तिने मंगळसूत्राच्या वाट्या दाखविण्यास सांगितले. हातचलाखीने एक जोडी चोरून तेथून पसार होत असतानाच एक वाटी गायब असल्याचे बेरागी यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा करीत एका महिलेच्या मदतीने चौकामध्ये धावत जात आरोपीला पकडले. तिच्याकडे मंगळसूत्रातील एक वाटी सापडली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The woman was caught stolen