आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकणी महिलेस अटक

By Admin | Updated: November 21, 2014 04:20 IST2014-11-21T04:20:38+5:302014-11-21T04:20:38+5:30

सारोळा येथे १४ ओक्टोबर रोजी नीरा नदीत खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून राजेंद्र गजानान हेंद्रे (वय ४६ ) व नंदा राजेंद्र हेंद्रे्रे या

The woman was arrested after suicidal tendencies | आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकणी महिलेस अटक

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकणी महिलेस अटक

नसरापूर : सारोळा येथे १४ ओक्टोबर रोजी नीरा नदीत खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून राजेंद्र गजानान हेंद्रे (वय ४६ ) व नंदा राजेंद्र हेंद्रे्रे या दांपत्याने उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी किकवी पोलिसांनी जयश्री सुरेश कामथे (४५ , रा.निगडी) हिला अटक केली आहे
राजगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र्र मांजरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेंद्रे दांपत्य आत्महतेप्रकरणी जयश्री सुरेश कामथे व महेश बाळासाहेब काकडे (वय 30 रा.चहीली) व जयंतीलाल पुखराज जैन ( वय ५७ रा.निगडी) यांच्या विरुद्ध किकवी पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला असून, महेश काकडे व जयंतीलाल जैन यांचा शोध सुरू आहे.
या गुन्ह्यातील आरोपी महेश बाळासाहेब काकडे व जयंतीलाल जैन यांचेकडून जयश्री सुरेश कामथे हिच्या मध्यस्थीने राजेंद्र गजानान हेंद्रे यांनी पंधरा लाख रुपये कर्जाऊ घेतले होते. त्यामुळे ते सावकार नेहमी त्रास देत. आत्महत्या केलेल्या दांपत्याकडे, वरील तीन सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची त्यांच्याकडे चिठ्ठी मिळाली होती. राजगड पोलिसांनी घटनेच्या वेळी अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती. (वार्ताहर)

Web Title: The woman was arrested after suicidal tendencies