कुरकुंभ येथे महिलेवर अत्याचार, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:08 IST2021-03-30T04:08:41+5:302021-03-30T04:08:41+5:30

विशाल रोहिदास चौधरी (वय ३२, रा.खुटबाव ) व देवीदास केरबा पवार (वय ४0, नाथाचीवडी) व अन्य एक महिला अशी ...

Woman tortured at Kurkumbh, three arrested | कुरकुंभ येथे महिलेवर अत्याचार, तिघांना अटक

कुरकुंभ येथे महिलेवर अत्याचार, तिघांना अटक

विशाल रोहिदास चौधरी (वय ३२, रा.खुटबाव ) व देवीदास केरबा पवार (वय ४0, नाथाचीवडी) व अन्य एक महिला अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, २४ मार्च रोजी पीडितेला बचत गटाचे काम असल्याचे सांगत तिघांनी एका कारमध्ये बसवून परिसरातील एका लॉजवर नेले. दरम्यान, या तिघांच्या संशायास्पद कृत्यांमुळे पीडितेने आरोपी महिलेला आपण कोठे जात आहोत सांग, मला अशी विचारणा केली. त्यावेळी त्या महिलेने शांत बस, असे सांगत लॉजमधील एका रुममध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर विशाल चौधरी व देवीदास पवार पीडितेला दमदाटी केली. तर विशाल चौधरी याने पीडितेला मारहाण करत अत्याचार. दरम्यान, २५ मार्च रोजी पीडितेने दौंड पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एक कारही जप्त केली.

Web Title: Woman tortured at Kurkumbh, three arrested