स्त्री हीच सहनशीलतेची क्षीती - रामचंद्र देखणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:09 IST2020-12-09T04:09:13+5:302020-12-09T04:09:13+5:30
पुणे : “स्त्री ही सहनशीलतेची क्षिती आहे. हे व्यापकत्व घेऊनच भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री उभी आहे. त्याचे चित्रण तमोहरा कादंबरीत ...

स्त्री हीच सहनशीलतेची क्षीती - रामचंद्र देखणे
पुणे : “स्त्री ही सहनशीलतेची क्षिती आहे. हे व्यापकत्व घेऊनच भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री उभी आहे. त्याचे चित्रण तमोहरा कादंबरीत केले आहे,” असे विचार संतसाहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
यशोदीप प्रकाशनाच्या वतीने विजय शेंडगे यांच्या ‘तमोहरा’ कादंबरीचे प्रकाशन डॉ. देखणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कवी उद्धव कानडे होते. ग्रामीण कथाकार बबन पोतदार, सतीश गयावळ, डॉ. सुधाकर न्हाळदे, नगरसेविका आशाताई धायगुडे-शेंडगे, सेठ दगडूराम कटारिया हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय शेंडगे आदी यावेळी उपस्थित होते.
विजय शेंडगे म्हणाले की समाजाच्या दृष्टिकोनातून लेखकाची भूमिका ही होकायंत्राची असली पाहिजे. मूठभर बिघडलेल्या व्यवस्थेचे चित्रण करताना लेखकाने वादळात सापडलेली नौका होऊ नये. कवी धनंजय तडवळकर यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी गयावळ यांनी आभार मानले.