ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:27 IST2020-12-14T04:27:57+5:302020-12-14T04:27:57+5:30

पुणे : मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौकात भरधाव जाणार्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला. मंजुळा प्रकाश येन्कची ...

Woman killed in truck crash | ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुणे : मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौकात भरधाव जाणार्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला.

मंजुळा प्रकाश येन्कची (वय ५०, रा. मळवली, ता. मावळ) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी ट्रकचालक संतोष प्रकार गायकवाड (वय ३२, रा. निमगाव म्हाळुंगे, ता. शिरुर) याला अटक केली आहे. याबाबत दुचाकीस्वार आकाश सागर (वय २०, रा. परिहार चौक, औंध) यांनी मार्केटयार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आकाश त्याची मामी मंजुळा यांना दुचाकीवरुन घेऊन गंगाधाम चौकातून शुक्रवारी रात्री जात होते. यावेळी ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यात मागे बसलेल्या मंजुळा या जबर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. सागर याच्या हाताला दुखापत झाली. पोलीस उपनिरीक्षक एस. पी. शिंदे तपास करीत आहेत.

Web Title: Woman killed in truck crash