शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Leopard Attack: बिबटयाने अचानक केलेल्या हल्ल्यात महिला जखमी; जुन्नर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 13:35 IST

दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्यावर ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबटयाने अचानक केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली

पिंपरी पेंढार : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक शिवरात दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्यावर ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबटयाने अचानक केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली. मंगळवारी सायंकाळनंतर सव्वा सात वाजन्याच्या दरम्यान ही घटना घडली.

 मिळालेल्या माहितीनुसार, हौसाबाई दत्तात्रय शिंदे (रा. शिंदेमळा बोरी बु.) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पत्नी हौसाबाई शिंदे हे दुचाकीवरून बोरी गावठानातुन रस्त्याने त्यांच्या शिंदेमळा येथील राहत्या घरी जात होते. सिद्धेश्वर मंदिराजवळ उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबटयाने अचानक दुचाकीवर झड़प मारली. या हल्ल्यात हौसाबाई शिंदे यांच्या डाव्या पायाला कड़ाडून चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या आहेत.   दरम्यान घटनेची माहिती मिळताच आळे वनपरिमंडलचे वनपाल संतोष साळूखे, वनरक्षक त्र्यम्बक जगताप व ग्रामस्थ घटनास्थळी आले. जखमी हौसाबाई शिंदे यांना उपचारासाठी आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु लस उपलब्ध न झाल्याने त्यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

या परिसरात ऊसाचे योग्य क्षेत्र व पाण्याची उपलब्धता तसेच खाद्यास मिळणारे पाळीव प्राणी यामुळे गेली कित्येक वर्षापासून बिबटयाचा वावर आहे. काल सायंकाळी दुचाकीवर केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाल्याच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबटयाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Junnarजुन्नरleopardबिबट्याPoliceपोलिसforest departmentवनविभाग