महिलेचा विनयभंग करणाऱ्यास दिला चोप, मंडईत भरदिवसा घडला प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:46 IST2018-10-23T00:46:06+5:302018-10-23T00:46:10+5:30
मंडईमध्ये भरदिवसा एका महिलेला वेश्या समजून तिचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून नागरिकांनी त्याला चांगलाच चोप देण्यात आला.

महिलेचा विनयभंग करणाऱ्यास दिला चोप, मंडईत भरदिवसा घडला प्रकार
पुणे : मंडईमध्ये भरदिवसा एका महिलेला वेश्या समजून तिचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून नागरिकांनी त्याला चांगलाच चोप देण्यात आला. विश्रामबाग पोलिसांनी त्याला अटक केली आहे़ पुरण लालसिंग मिझार (रा़ मुकुंदनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे़ याप्रकरणी एका पिडित महिलेने विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दोन महिला सोमवारी सकाळी मंडईमध्ये आला होता़ अंगाने जाडजुड असलेल्या पुरण मिझार हा दारु पिला होता़ त्याने या महिलांचा विनयभंग केला़ तेव्हा त्यांनी आरडाओरडा केल्याने नागरिक जमले़ त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला़ त्यानंतर त्याला घेऊन नागरिक मंडई पोलीस चौकीत गेले़ नागरिक प्रचंड संतापलेले पाहून पोलिसांनी तातडीने या महिलेची तक्रार घेऊन मिझार याला अटक केली आहे़