चारित्र्याच्या संशयावरून महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:22 IST2020-12-03T04:22:30+5:302020-12-03T04:22:30+5:30

पुणे : दारू पिऊन शिवीगाळ करीत चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २७ नोव्हेंबरला ...

Woman commits suicide on suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरून महिलेची आत्महत्या

चारित्र्याच्या संशयावरून महिलेची आत्महत्या

पुणे : दारू पिऊन शिवीगाळ करीत चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २७ नोव्हेंबरला वारजे माळवाडीत घडली. रमेश नारायण कदम असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.

मनिषा रमेश कदम (रा. वारजे माळवाडी)असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा आणि रमेश यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर रमेश दारू पिऊन मनिषाला शिवीगाळ करून मारहाण करीत होता. तिच्या चारित्र्यावर देखील संशय घेत तिला उपाशी ठेवत होता. पतीने नांदविण्यास नकार दिल्यामुळे छळास कंटाळून मनिषाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: Woman commits suicide on suspicion of character