शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कौटुंबिक वादातून महिलेची गळफास घेत आत्महत्या; कोथरुडमधील तिसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 01:10 IST

तीन वर्षांपूर्वी झाला होता विवाह..

ठळक मुद्देअलंकार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

पुणे : कौटुंबिक वादातून एका महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोथरुडमध्ये घडली. भाग्यश्री अमेय पाटील (वय ३०, रा. पश्चिमानगर, कोथरुड) असे या महिलेचे नाव आहे. भाग्यश्री वास्तुविशारद होत्या. त्यांचे पती अमेय संगणक अभियंता आहेत. त्यांचा ३ वर्षांपूर्वी विवाह झाला होता.लॉकडाऊनच्या काळात दोघेही घरीच होते.दोघांमध्ये बुधवारी किरकोळ कारणावरुन वाद झाला.त्यानंतर भाग्यश्री खोलीत निघून गेल्या. त्यांनी खोलीचा दरवाजता आतून बंद केला. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळीही भाग्यश्री यांनी दरवाजा उघडला नाही. अमेय यांनी दरवाजा वाजविला तरी त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा त्यांनी इतरांच्या मदतीने दरवाजा उघडल्यावर भाग्यश्री यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.अलंकार पोलीस ठाण्यात एका आठवड्याच्या आत आत्महत्येच्या तीन घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यु झाला आहे.अगोदर गोरे दाम्पत्यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर डहाणुकर कॉलनीतील वरदा माडगुळकर यांनी नवव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती.

टॅग्स :kothrudकोथरूडWomenमहिलाDeathमृत्यू