सासूरवासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:14 IST2021-08-14T04:14:40+5:302021-08-14T04:14:40+5:30

पुणे : लग्नात मानापमान केला नाही, स्वयंपाक चांगला येत नाही, अशा सासरकडच्यांच्या सततच्या टोचणी आणि शिवीगाळाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने ...

Woman commits suicide after getting fed up with her father-in-law | सासूरवासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

सासूरवासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

पुणे : लग्नात मानापमान केला नाही, स्वयंपाक चांगला येत नाही, अशा सासरकडच्यांच्या सततच्या टोचणी आणि शिवीगाळाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (दि.११) वडकीतील एका इमारतीत ही घटना घडली.

मयुरी पांडुरंग कस्पटे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पांडुरंग कस्पटे याच्यासह इतरांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयुरी आणि पांडुरंग यांचे मे २०२० मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर मयुरीचा सासरच्यांनी छळ सुरू केला. जागा घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आण, लग्नात मानपान केला नाही, कपडे घेण्यासाठी ५ हजार रुपये दिले नाही, स्वयंपाक चांगला करीत नाही, असे टोचून बोलून शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यामुळे या सततच्या छळास कंटाळून मयूरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एन. एस. निंबाळकर तपास करीत आहेत.

-------------------------------------------------------------------------

Web Title: Woman commits suicide after getting fed up with her father-in-law