शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नी व अडीच वर्षाच्या मुलीची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 09:05 IST

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने आपली पत्नी व अडीच वर्षांच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या  केल्याचा खळबळजनक प्रकार ताडीवाला रोड येथे पहाटे पाच वाजता घडला.

ठळक मुद्देचारित्र्याच्या संशयावरुन पतीने आपली पत्नी व अडीच वर्षांच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या  केल्याचा खळबळजनक प्रकार ताडीवाला रोड येथे घडला. तबस्सुम शेख आणि मुलगी अलिना शेख असे मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत.आयाज याला ससुन रुग्णालयात दाखल केले असून हत्येसाठी वापलेला चाकू जप्त केला आहे.

पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने आपली पत्नी व अडीच वर्षांच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या  केल्याचा खळबळजनक प्रकार ताडीवाला रोड येथे पहाटे पाच वाजता घडला. तबस्सुम शेख आणि मुलगी अलिना शेख असे मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत. त्यानंतर पतीने स्वत:वरही वार करुन घेतले असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. आयाज शेख (30) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयाज शेख हा एका खाद्यपदार्थाच्या दुकानात कामाला आहे. त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातून त्यांची नेहमी भांडणे होत होती. त्यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही केला होता. त्याची सुनावणी पूर्ण झाली होती. येत्या महिन्याभरात त्यावर निकालही लागणार होता. तबस्सुम या ताडीवाला रोडवरील बुद्ध विहाराजवळील वडिलांच्या घरी मुलीसह रहात होती. मंगळवारी पहाटे आयाज तेथे आला. त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली. त्यावेळी रागाच्या भरात आयाज शेख याने पत्नीला चाकूने वार करुन तिची हत्या केली. तिच्या पाठोपाठ अडीच वर्षाच्या अलिना हिच्यावरही वार करुन तिला मारले. त्यानंतर त्याच चाकूने त्याने स्वत:च्या पोटावर वार करुन घेतले.

घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आयाज याला ससुन रुग्णालयात दाखल केले असून हत्येसाठी वापलेला चाकू जप्त केला आहे.

टॅग्स :PuneपुणेMurderखून