महिलेला बेशुद्ध करून दागिने पळविले

By Admin | Updated: April 26, 2017 02:50 IST2017-04-26T02:50:36+5:302017-04-26T02:50:36+5:30

येथील दिघेवस्तीतील एका महिलेला चहा पावडरचा वास देऊन महिला बेशुद्ध पडल्यावर गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने दोन भामट्यांनी काढून नेल्याची घटना मंगळवारी (दि.२५) घडली आहे.

The woman abducted and stole jewelry | महिलेला बेशुद्ध करून दागिने पळविले

महिलेला बेशुद्ध करून दागिने पळविले

दावडी : येथील दिघेवस्तीतील एका महिलेला चहा पावडरचा वास देऊन महिला बेशुद्ध पडल्यावर गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने दोन भामट्यांनी काढून नेल्याची घटना मंगळवारी (दि.२५) घडली आहे.
सकाळी दहाला दावडी येथील दिघेवस्तीत घरासमोर तेजस्विनी विठ्ठल दिघे (वय २६) या घराबाहेर भांडी घासत होत्या. घरातील सर्व व्यक्ती कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.
दरम्यान, चहा पावडर विकण्याचा बहाणा करून दोन भामटे काळी पल्सर गाडीवर आले. चांगल्या राहणीमानावरून सेल्समन आहे, भास निर्माण केला. तेजस्विनी या घराबाहेर भांडी घासत असताना या दोन भामट्यांनी भय्या नावाची चहा पावडर बॅगेतून काढली.
चांगली चहा पावडर आहे विकत घ्या, असे सांगत हातावर थोडी चहा पावडर देऊन छान आहे वास घेऊन पाहा, असे महिलेला सांगितले. त्यांनी पावडर नाकाजवळ नेताच त्यांना चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्या. दरम्यान, दोन भामट्यांनी या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे दागिने काढून पिंपळगावच्या दिशेने धूम ठोकली. काही वेळाने त्या शुद्धीवर आल्यानंतर गळ्यातील दागिने नसल्याचे समजले.

Web Title: The woman abducted and stole jewelry