वाळूमाफियांचा भीमेत धुमाकूळ

By Admin | Updated: June 23, 2014 22:04 IST2014-06-23T22:04:10+5:302014-06-23T22:04:10+5:30

मूळगार (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या पात्रत रात्रीच्या सुमारास वाळूमाफियांनी नंग्या तलवारी काढून धुमाकूळ घातला.

Wolfgang | वाळूमाफियांचा भीमेत धुमाकूळ

वाळूमाफियांचा भीमेत धुमाकूळ

>दौंड : मूळगार (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या पात्रत रात्रीच्या सुमारास वाळूमाफियांनी नंग्या तलवारी काढून धुमाकूळ घातला.
दरम्यान, संतप्त ग्रामस्थांच्या जमावाने आक्रमक पवित्र घेतल्याने परिस्थितीचे भान ठेवून वाळूमाफियांनी तलवारीसह पलायन केले. संतप्त ग्रामस्थांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार गार ग्रामपंचायतीने परिसरात वाळूउपसा न करण्याचा ठराव ग्रामसभेत घेतला आहे. त्यानुसार गेल्या तीन ते चार दिवसांपासून काही मंडळी या भागात सर्रासपणो वाळूउपसा करीत आहेत. याची चाहूल ग्रामस्थांना लागली, तसेच रात्रीच्या सुमारास काही मंडळी जेसीबीच्या साहाय्याने वाळूउपसा करीत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच साधारणत: 1क्क् च्या जवळपास ग्रामस्थ नदीपात्रत गेले. या वेळी त्यांनी वाळूउपसा करणा:यांना मज्जाव केल्यामुळे वातावरण चिघळले. दरम्यान, काही वेळांत स्कॉर्पिओत तिघे जण नदीकाठी आले आणि तलवारीसह खाली उतरून ग्रामस्थांना दमदाटी करू लागले. 
जेसीबी आणि त्याच्या चालकाला तहसीलदार आल्याशिवाय सोडणार नाही, असा पवित्र ग्रामस्थांनी घेतला. त्यानुसार पहाटे पाचर्पयत पोलीस निरीक्षक नवनाथ मदने नदीपात्रत तळ ठोकून होते. सकाळी 9 च्या सुमारास तहसीलदार उत्तम दिघे घटनास्थळी आल्यानंतर जेसीबीचालकाला जेसीबीसह तहसीलदारांच्या ताब्यात दिले. 
परिणामी, मंडलाधिकारी महादेव ठोंबरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. साधारणत: गेल्या पाच दिवसांपासून 89 हजार 9क्क् रुपयांची 6क् ब्रास वाळू चोरीला गेल्याची फिर्याद दिली आहे. जेसीबीचालक एकनाथ भोग, जेसीबीचा मालक कुल (पूर्ण नाव माहीत नाही), सोमनाथ कांबळे यांच्यासह अन्य काही व्यक्तींनी वाळू चोरली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी वाळू चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. 
 
4‘कोण आम्हाला वाळू काढण्यापासून अडवतो, त्याला आम्ही बघून 
घेऊ,’ यासह दमदाटीची भाषा चोरटय़ांनी केली. त्यानंतर ग्रामस्थ 
आक्रमक झाल्याने वातावरण तंग झाले. वाळू चोरटय़ांनी तलवारीसह पळ काढला. अन्यथा वाळू चोरटय़ांना या वेळी मोठी किंमत मोजावी लागली असती, असे काही ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी जेसीबीचालकाला घेराव घालून नदीपात्रत अडवून ठेवले. दरम्यान, ग्रामस्थांनी तलाठय़ाला फोन केला. त्यानुसार पाच तलाठी, साहायक पोलीस निरीक्षक नवनाथ मदने रात्रीच्या सुमारास घटनास्थळी आले. त्यानंतर वातावरण निवळले.
 

Web Title: Wolfgang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.