राज्यस्तरीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी साक्षी करे

By Admin | Updated: May 12, 2017 04:51 IST2017-05-12T04:51:50+5:302017-05-12T04:51:50+5:30

महाराष्ट्र राज्य कुमार गट खो-खो संघाची कर्णधार साक्षी भाऊसाहेब करे हिचा बुधवारी बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

Witness the state-level Kho-Kho team captain | राज्यस्तरीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी साक्षी करे

राज्यस्तरीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी साक्षी करे

लोकमत न्यूज नेटवर्क
बावडा : महाराष्ट्र राज्य कुमार गट खो-खो संघाची कर्णधार साक्षी भाऊसाहेब करे हिचा बुधवारी बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साक्षी करे ही इंदापूर तालुक्यातील वरकुटे ब्रु.या गावची रहीवाशी आहे.
बावडा येथे साक्षी करे हिचा सत्कार करून हर्षवर्धन पाटील यांनी तिला येत्या दि. २४ ते २८ मे या कालावधीत नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आबासाहेब शिंगाडे, सुभाष काळे, सुरेश मेहेर, महादेव घाडगे, भाऊसाहेब करे, संदिप बल्लाळ, कैलास जाधव, अनिल जाधव उपस्थित होते. भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन याचे वतीने या स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी साक्षी करे ही महाराष्ट्र राज्य संघाचे नेतृत्व करणार आहे. साक्षी हिला आगामी काळात सर्व सहकार्य केले जाईल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Witness the state-level Kho-Kho team captain