पुणे : कोणताही गायक राग, त्याच्यातील सौंदर्य उलगडताना वेगवेगळ्या हरकती, ताना, आलापी यांचे सादरीकरण करतो. मात्र त्या कलेचा आनंददेखील तितकाच महत्त्वाचा असतो आणि संगीताशिवाय सात्त्विक आनंद दुसरा कशातचं मिळत नाही. तरुणाईला हवे असणारे, त्यांच्याशी संवाद साधणारे, त्यांना आपलेसे करणारे संगीत निर्माण करण्याची गरज आहे. संगीत व गायकीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचता येते, संवाद साधता येतो हा जणू एक आशीर्वादच असल्याचे मानतो. पुण्यात सादरीकरणाचा मला कायमच अद्वितीय आनंद मिळतो, अशी भावना प्रसिद्ध युवा गायक महेश काळे यांनी व्यक्त केली.
...............
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. या शहरात दिवाळीच्या रम्य दिवसांमध्ये दिवाळी पहाटसारखा अत्युच्च आनंद देणारा संगीत कार्यक्रम आयोजित होतो आणि हजारो पुणेकर संगीताचा आनंद लुटतात, ही बाबच दिवाळीची गोडी अनेक पटीने वाढवणारी आहे. दर्जेदार कलाकारांच्या सादरीकरणामुळे दिवाळीचे कलात्मक मूल्य वाढते. ‘लोकमत’च्या अशा अभिजात उपक्रमामध्ये सहभागी व्हायला मिळणे ही माझ्यासाठी व्यक्तिगत आनंदाची बाब आहे. यंदाच्या -‘लोकमत दिवाळी पहाट’ला रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मी पुणेकरांना करतो. सलग तीन वर्षे दिवाळी पहाटच्या माध्यमातून ‘लोकमत’ समवेत पुणेकरांना सांस्कृतिक मेजवानी देताना आनंद होत आहे. - युवराज ढमाले, व्यवस्थापकीय संचालक, युवराज ढमाले कॉर्पोरेशन
...............
मोफत प्रवेशिका खालील ठिकाणी आज दुपारी २ वाजल्यापासून उपलब्ध रांका ज्वेलर्स केंद्र, लक्ष्मी रोड •कर्वे रस्ता •सिंहगड रस्ता ,रविवार पेठ. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शाखा : डहाणूकर कॉलनी, सेनापती बापट रस्ता, कर्वेनगर, नवी पेठ , सिंहगड रोड, रसिक साहित्य: अप्पा बळवंत चौक ,बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह 4काका हलवाई स्वीट सेंटर: * आयुर्वेदिक रसशाळेसमोर, कर्वे रोड शॉप नं. 2, चित्रलेखा अपार्टमेंट, आयडियल कॉलनी, पौड रोड- शॉप नं. 1, अलंकार पोलीस चौकी, नवसह्याद्रीे. अभिनव कला महाविद्यालयजवळ, टिळक रोड, खत्री बंधू पॉट ऑइस्क्रीम व मस्तानी : विठ्ठल मंदिर कॉर्नर, कर्वेनगर. गंगाधाम भाग्योदय अपार्टमेंट, सिंहगड रोड. शिवाजी पुतळा चौक, कोथरूड. लोकमत कार्यालय: व्हिया व्हेंटेज बिल्डिंग, लॉ कॉलेज रोड. वडगाव कार्यालय: वडगाव खुर्द, सिंहगड रोड.