शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मी रोडवरील दुकानाचा ताबा घेऊन परस्पर विक्री; सराईत गुन्हेगारासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 19:04 IST

फिर्यादी यांचे 'मेसर्स कला' हे लक्ष्मी रोडवरील कुंटे चौकातील सेवासदन बिल्डिंग येथे दुकान आहे.

ठळक मुद्देस्वारगेट पोलिसांकडे फिर्याद;तिघांना अटक

पुणे : बनावट कागदपत्रे तयार करुन जबरदस्तीने सह्या घेऊन लक्ष्मी रोडवरील दुकानाचा ताबा घेतल्यानंतर ते दुकान परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सराईत गुंडासह तिघांना अटक केली आहे.

गणेश बाबुराव यादव (रा़ पर्वतीगाव), श्रीकांत वसंतराव तेरभाई (रा. भुसारी कॉलनी, कोथरुड) आणि परेश अनिलकुमार भंडारी (रा.महावीर रेसिडेन्सी, कोंढवा बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ गणेश यादव हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

याप्रकरणी महर्षीनगर येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे मेसर्स कला हे लक्ष्मी रोडवरील कुंटे चौकातील सेवासदन बिल्डिंग येथे दुकान आहे. फिर्यादी यांनी या दुकानाचे त्यांच्या हिस्स्याचे कुलमुख्यत्यार पत्र त्यांचे वडिलांचे नावे केल्याबाबत व वडिलांना काही आजाराचा त्रास असल्याचे आरोपींना माहिती होते. त्याचा फायदा घेऊन गणेश यादव याने त्यांच्या वडिलांना तुमच्या घरातील लोकांचे बरे वाईट करु अशी धमकी दिली. त्यांना व फिर्यादी यांचे चुलते यांना २५ सप्टेबर २०१८ रोजी मित्रमंडळ चौकातून जबरदस्तीने हवेली दुय्यम निबंधक कार्यालयात नेले. तेथे दुकानाचे प्रॉपर्टी मॅनेजर म्हणून गणेश यादव याची नेमणूक केल्याबाबतचे कुलमुखत्यार पत्रावर त्यांच्या वडिलांना सह्या करायला भाग पाडले. त्यानंतर त्याने इतरांच्या मदतीने दीड कोटी रुपये किंमत असलेल्या मेसर्स कला या दुकानाचा जबरदस्तीने ताबा घेतला. तसेचदुकानातील ३० लाख रुपयांचे महागडे फर्निचर, एलसीडी टिव्ही, कॅमेरे, दुकानातील सर्व माल एका व्यक्तीच्या ताब्यात दिला.दुकानातील त्यांची महत्वाची मुळ कागदपत्रे घेतली. यादव व तेरभाई यांनी काहीही अधिकार नसताना दुकानाचा ताबा परेश भंडारी यांना ताबा दिला. त्यानंतर आता फिर्यादी यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक